सध्या बॉलिवूडमधील अनेक कलाकार लग्नबंधनात अडकत असल्याचे पाहायला मिळते. आदित्य नारायण, नेहा कक्कर, शाहीर शेख यांच्यापाठोपाठ आता ‘मर्डर २’ या हिंदी चित्रपटात काम करणारी अभिनेत्री सुलग्ना पाणीग्रहीने लग्न केल्याचे समोर आले आहे. सुलग्नाने अतिशय लोकप्रिय विनोदी कलाकारक बिस्वा कल्याण रथशी लग्न केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नुकताच सुलग्नाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर लग्नातील फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती अतिशय सुंदर दिसत आहे. लग्नातील फोटो शेअर करत सुलग्नाने मजेशीर कॅप्शनही दिले आहे. ‘आम्ही लग्न केले आहे’ असे तिने कॅप्शनमध्ये म्हटले आहे.

सुलग्नाने ‘मर्डर २’ या चित्रपटात भूमिका साकारली होती. त्याचबरोबर तिने अनेक मालिकांमध्ये ही काम केले आहे. सुलग्ना हिने इश्क वाला लव्ह या मराठी चित्रपटात देखील भूमिका साकारली आहे. या चित्रपटात ती अभिनेता आदिनाथ कोठारेसोबत मुख्य भूमिकेत दिसली होती.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Murder 2 actress sulagna panigrahi gets married avb