‘सैराट’ या चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर दोन वर्षांनंतर दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा ‘पावसाचा निबंध’ हा लघुपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या लघुपटाचा टीझर नुकताच युट्यूबवर प्रदर्शित झाला असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. ‘आटपाट प्रॉडक्शन्स’ निर्मित या लघुपटाची कथा नागराज यांनीच लिहिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मंजुळेंनी त्यांच्या अधिकृत फेसबुक अकाऊंटवर यासंदर्भात माहिती दिली आहे. ‘सैराटनंतर दोन वर्षांनी ‘पावसाचा निबंध’ हा लघुपट दिग्दर्शित केला. खूप दिवसांपासून ही गोष्ट सांगायची होती पण काही कारणांनी पुढे ढकलली जात होती,’ असं लिहित त्यांनी हा टीझर शेअर केला आहे.
विशेष म्हणजे ‘पावसाचा निबंध’ या लघुपटाची निवड ‘इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ लॉस एन्जेलिस’मध्ये झाली आहे. येत्या १३ एप्रिलला IFFLAमध्ये तो प्रदर्शित होणार आहे.

वाचा : अखेर कपिल शर्माच्या मदतीला धावली ‘भाभीजी’

‘सैराट’नंतर नागराज मंजुळेंच्या आगामी चित्रपटाकडे प्रेक्षकांचं लक्ष लागून राहिलं होतं. आता दोन वर्षांनंतर ‘पावसाचा निबंध’ हा लघुपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagraj manjule pavsacha nibandh short film teaser released