छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय अभिनेता नकुल मेहता लग्नाच्या जवळपास आठ वर्षांनंतर बाबा झाला आहे. नकुलच्या पत्नीने ३ फेब्रुवारी २०२१ रोजी एका मुलाला जन्म दिला आहे. नकुलने मुलाचा फोटो शेअर करत चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. त्याच्या या पोस्टवर अनेक कलाकारांनी कमेंट करत शुभेच्छा दिल्या आहेत.
नकुलने नुकताच त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर बाळाचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्याने ‘३ फेब्रुवारी २०२१… आमचा फोटो’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे. त्याच्या या फोटोवर अभिनेत्री क्रृतिका कामरा, अमोल पराशर, सैय्यमी खेर, ऋत्विक धनजानी, दृष्टी धामी, दिशा परमान अशा अनेक कलाकारांनी कमेंट करत शुभेच्छा दिल्या आहेत.
नोव्हेंबर महिन्यात नकुलनने त्यांच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन होणार असल्याचे म्हटले होते. लग्नाच्या आठ वर्षांनंतर नकुल आणि जानकी मेहताने आई-वडिल होणार असल्याची माहिती दिली होती. त्यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करत याबाबत माहिती दिली होती.
नकुलने २०१२मध्ये ‘प्यार का दर्द है मीठा मीठा प्यारा प्यारा’ या मालिकेत काम केले होते. या मालिकेने त्याला लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचवले होते. त्यानंतर त्याने इश्कबाज, दिल वाले ओबेरॉय या मालिकांमध्ये काम केले. नकुलचा चाहता वर्ग देखील मोठा आहे.