गेल्या काही दिवसांपासून नेहा कक्कर आणि आदित्य नारायण १४ फ्रेबुवारी रोजी लग्न बंधनात अडकणार असल्याच्या चर्चा रंगल्या. या चर्चा आदित्य  इंडियन आयडल पर्व ११च्या सेटवर नेहासोबत करत असलेल्या मस्तीमुळे सुरु झाल्या होत्या. पण आता उदित नारायण यांनी आदित्यच्या लग्नाबाबत मोठा खुलासा केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उदित नारायण यांना नुकताच दिलेल्या मुलाखतीमध्ये आदित्यच्या लग्नाबाबत काही प्रश्न विचारण्यात आले होते. त्यावर त्यांनी ‘मी आणि माझी पत्नी आदित्यच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहात आहोत. पण आदित्य इतक्यात लग्नबंधनात अडकणार नाही’ असे ते म्हणाले.

पुढे उदित नारायण यांनी नेहा आणि आदित्यच्या लग्नाच्या सर्व अफवा आहेत असे म्हटले. ‘मला असे वाटते की आदित्य आणि नेहाच्या लग्नाच्या अफवा या केवळ इंडियन आयडल शोचा टीआरपी वाढवण्यासाठी पसरवल्या जात आहेत. कारण या शोमध्ये माझा मुलगा सूत्रसंचालक आहे आणि नेहा परिक्षक’ असा खुलासा उदित नारायण यांनी केला.

इंडियन आयलच्या सेटवर आदित्य नेहासोबत सतत फ्लर्ट करताना दिसतो. तसेच शोमध्ये नेहाने आदित्यची आई दीपा यांना ‘सासू माँ’ म्हणून आवाज दिला होता. त्यामुळे त्या दोघांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आले होते. पण या सर्व अफवा असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Neha kakkar and adityas marriage rumour is just to boost trps of indian idol said by udit narayan avb