बॉलिवूड सेलिब्रिटींची लग्न असो किंवा कोणताही सोहळा हा कायमच चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत असतो. त्यामुळे सध्या लोकप्रिय गायिका नेहा कक्कर आणि रोहनप्रीत यांच्या लग्नाची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा सुरु आहे. नेहाच्या मेहंदी सोहळ्यापासून ते लग्नाच्या रिसेप्शनपर्यंत अनेक फोटो तिने चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. तर या लग्नातील काही अनसीन फोटो, व्हिडीओ तिच्या फॅनपेजवरदेखील शेअर करण्यात आले आहेत. यामध्येच नेहाच्या लग्नातील एका केकची जोरदार चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे.
नेहाच्या एका फॅनपेजवर तिच्या लग्नातील व रिसेप्शनमधील काही फोटो, व्हिडीओ शेअर करण्यात आले आहेत. यामध्येच रोहनप्रीत आणि नेहा लग्नाचं सेलिब्रेशन म्हणून केक कापताना दिसत आहेत. मात्र, हा केक साधासुधा नसून खास असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे.
खास नेहा व रोहनप्रीतसाठी तयार करण्यात आलेल्या केकवर या दोघांच्या लग्नसोहळ्यातील काही आठवणी दाखवण्यात आल्या आहेत. यात त्यांच्या हळदी समारंभातील एक छानसा फोटो केकच्या मध्यभागी लावण्यात आला आहे. त्यामुळे हा केक नेहा-रोहनप्रीतसाठी खास असल्याचं सांगण्यात येत आहे.
दरम्यान, २४ ऑक्टोबर रोजी नेहा-रोहनप्रीतचा दिल्लीत लग्नसोहळा पार पडला. या लग्नसमारंभात जवळचे मित्र-मैत्रिणी आणि कुटुंबातील काही सदस्य होते. त्यानंतर २६ ऑक्टोबरल चंदीगढमध्ये त्यांची रिसेप्शन पार्टी झाली असून लवकरच मुंबईतदेखील त्यांनी एका जंगी पार्टीचं आयोजन केल्याचं सांगण्यात येत आहे.