गेल्या काही दिवसांपासून गायिका नेहा कक्कर लग्न बंधनात अडकणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. नेहाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत या सर्व चर्चांना दुजोरा दिला होता. पण आता नेहाने शेअर केलेल्या पोस्टमुळे नेहा खरंच लग्न बंधनात अडकणार आहे की या सर्व चर्चा तिच्या आगामी अल्बममुळे सुरु झाल्या आहेत असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. गायक विशाल दादलानीने तर नेहाच्या फोटोवर कमेंट करत याबाबत तिला विचारले देखील आहे.

नुकताच नेहाने तिचा आगामी अल्बमचे पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये नेहा गायक रोहनप्रीतसोबत दिसत आहे. त्यामुळे आता नेहा नक्की लग्न करणार आहे की या सर्व चर्चा तिच्या अल्बममुळे सुरु झाल्या आहेत असा प्रश्न अनेकांना पडला आहे. गायक विशाल दादलानीने देखील नेहाच्या या पोस्टवर कमेंट करत प्रश्न विचारला आहे.

‘नेहा आता तू मला गोंधळात टाकते. नेहा आणि रोहन तुमच्या लग्नाच्या चर्चा सुरु आहेत की या आगामी गाण्याच्या? खरं खरं सांगा. अरे मी तुमच्या लग्नासाठी नवे कपडे घेऊ की हे गाणे डाऊनलोड, शेअर आणि लाईक करायचे आहे?’ अशी कमेंट विशालने नेहाच्या पोस्टवर केली आहे.

नेहा आणि गायक रोहनप्रीत सिंह लग्न करणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहेत. नेहा दिल्लीमध्ये काही मोजक्याच लोकांच्या उपस्थितीमध्ये लग्न बंधनात अडकणार असे म्हटले जात होते. पण आता नेहाने शेअर केलेल्या पोस्टवर नेहा लग्न करणार आहे की या सर्व चर्चा तिच्या अल्बममुळे सुरु झाल्या आहेत असा प्रश्न अनेकांना पडला आहे.