गेल्या काही वर्षात महाराष्ट्रामधल्या असंख्य युवकांच्या मनात आपलं एक प्रेमाचं आणि हक्काचं स्थान निर्माण केलेली मराठी वाहिनी म्हणजे ‘झी युवा’. या वाहिनीवरील ‘फुलपाखरू’ ही मालिका आज लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. यातली वैदेही (हृता दुर्गुळे) आणि मानस (यशोमान आपटे) यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. कॉलेजच्या अल्लड वयात जुळलेलं प्रेम.. त्यांचा एकमेकांवरचा लटका राग.. त्यांची खोडकर मस्ती.. थोडे रुसवे – फुगवे.. एकमेकांवर निरपेक्ष प्रेम करणाऱ्या मानस आणि वैदेहीची ही प्रेमकथा म्हणजे ‘फुलपाखरू’.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

धुळवडीच्या दिवशी मानस आणि वैदेही एका निसटत्या क्षणी एकमेकांच्या अत्यंत जवळ आले. दोघांच्याही कुटुंबीयांकडून त्यांच्या प्रेमाला सुखद होकारसुद्धा मिळाला असल्याने दोघेही खुश आहेत. सगळं आलबेल असताना अचानक रॉकीने या दोघांमध्ये एन्ट्री घेतली आहे. मायाचा मित्र असलेल्या रॉकीने दिलेलं चॅलेंज वैदेहीने स्विकारलं आहे. रॉकीला हरवण्यासाठी मानस आणि वैदेहीने आपल्या मित्रांना घेऊन ‘दोस्ती’ बॅंड सुरु केला आहे. सगळेच नवीन असल्यामुळे त्यांची थोडी धांदल उडत आहे, पण तरीही मानस आणि वैदेही सगळ्यांना साथ देत आहेत. आपल्या होणाऱ्या सुनाबाईंचा अपमान सहन न होऊन मानसचे वडीलही त्यांना हवी ती मदत करायला तयार झालेले आहेत.

वाचा : प्रिया वारियरच्या चित्रपटाबाबत झालेल्या ‘त्या’ चर्चा अफवाच

वैदेहीने घेतलेलं आव्हान पूर्ण करण्याच्या दृष्टीने मानस बॅंडसाठी एक नवीन गाणं लिहिणार आहे. गुढीपाडव्याचा दिवशी वैदेही समोर असताना अचानक मानसला हे गाणं सुचतं. ‘फुलपाखरू’च्या प्रेक्षकांसाठी या नव्या गाण्याची पर्वणी असणार आहे. तिथे माया मानसला वैदेहीपासून वेगळं करण्यासाठी तान्या आणि रॉकीला हाताशी धरून नवनवीन चाली खेळत आहे. मानसचं गाणं हे बॅण्डचं गाणं होऊ शकेल का? या गाण्याने दोस्ती बॅण्ड रॉकीला हरवू शकेल का? वैदेहीने घेतलेल्या चेलेंजमध्ये ती कितपत यशस्वी होऊ शकेल? माया वैदेहीला हरवण्यासाठी कुठला नवीन डाव खेळेल? हे जाणून घेण्यासाठी पाहा गुढीपाडव्यानिमित्त ‘फुलपाखरू’ या मालिकेचा महाएपिसोड. हा महाएपिसोड येत्या रविवारी म्हणजेच १८ मार्च रोजी दुपारी १ आणि सायंकाळी ८ वाजता प्रसारित होणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New beginning in phulpakharu marathi serial on the occasion of gudi padwa zee yuva