अडीच -तीन महिन्यांच्या प्रदीर्घ काळाच्या लॉकडाउननंतर आता कलाविश्वातील कामकाजाला सुरुवात झाली आहे. अनेक मालिका, कार्यक्रम यांचं रखडलेलं चित्रीकरण पुन्हा एकदा सुरु होताना दिसत आहे. यामध्येच आता नवी उमेद नवी भरारी हा कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बऱ्याच दिवसानंतर प्रेक्षकांची आणि त्यांच्या आवडत्या मालिका, कलाकार यांची भेट होणार असल्यामुळे खास या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अवधूत गुप्ते करणार आहे. या कार्यक्रमास अभिनेता सचिन पिळगांवकर, आदेश बांदेकर, सुबोध भावे, जितेंद्र जोशी, स्पृहा जोशी ही कलाकार मंडळीही हजेरी लावणार आहे.

कलर्स मराठीवरील ‘सूर नवा ध्यास नवा’ कार्यक्रमातील सुरवीरांच्या गाण्यांनी अवघ्या महाराष्ट्राला मंत्रमुग्ध केले, त्यांच्या सुरांना संपूर्ण महाराष्ट्राने पसंती दिली. त्यातीलच काही सुरवीरांची सुरेल गाणी या कार्यक्रमात सादर होणार आहेत. ज्यांच्या सुरांनी सूर नवाचा मंच बहरून जायचा असे महेश काळे यांचे गाणे पुन्हा एकदा ऐकण्याची संधी या कार्यक्रमाद्वारे मिळणार आहे. तसंच सगळ्यांचा लाडका मॉनिटर म्हणजेच हर्षद नायबळदेखील या कार्यक्रमात हटके एण्ट्री करणार आहे.

दरम्यान, करोना संकटाचा मोठ्या धैर्याने सामना करत त्यावर मात मिळविणाऱ्या करोना योद्ध्यांचा प्रवासही यावेळी जाणून घ्यायला मिळणार आहे. तसंच कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिकांमधील कलाकार त्यांचे काही खास परफॉर्मन्स सादर करणार आहेत. सध्या लॉकडाउनच्या काळामध्ये सोशल डिस्टंसिंगचे पालन करत कार्यक्रमामधील अॅक्ट शूट करणे अनिवार्य होते आणि त्यामुळेच या कार्यक्रमामधील परफॉर्मन्समध्ये नक्कीच वेगळेपण दिसून येईल. आता ती गमंत काय असेल आणि कशाप्रकारे शूट केले असेल हे लवकरच कळणार आहे. तर “नवी उमेद नवी भरारी” हा कार्यक्रम २६ जुलै संध्या ७.०० वा. प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New entertainment program navi umed navi bharari coming soon ssj