छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री निया शर्मा साऱ्यांनाच ठावूक असेल. बोल्ड आणि हॉटफोटोशूटमुळे निया कायम चाहत्यांमध्ये चर्चेत येत असते. यात अनेकदा तिच्या पर्सनल लाइफचीदेखील चर्चा रंगत असते. काही दिवसांपूर्वी नियाने नवीन घर खरेदी केलं होतं. त्यानंतर आता नियाने एक नवीन ब्रॅण्ड न्यू कार खरेदी केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा निया चर्चेचा विषय ठरली आहे. विशेष म्हणजे तिची ही कार प्रचंड महाग असल्याचं सांगण्यात येत आहे.

सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या नियाने तिच्या नव्या कारचे काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत.सोबतच त्याला खास कॅप्शनदेखील दिली आहे. तुम्ही आनंद विकत घेऊ शकत नाही. पण कार नक्कीच घेऊ शकता आणि या हा आनंद समसमानच आहे, असं कॅप्शन तिने या पोस्टला दिलं आहे.

वाचा : मराठी चित्रपट निर्माते विक्रम धाकतोडे पोलिसांच्या ताब्यात; अमोल कागणेंची केली फसवणूक

नियाने व्हॉल्वो 90 D5 इंस्क्रिप्शन ही कार खरेदी केली असून या कारची किंमत जवळपास ८७ लाख रुपयांपेक्षा अधिक असल्याचं सांगण्यात येत आहे. निया छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री असून लवकरच ती नेहा आणि टोनी कक्करच्या गले लगाना है या गाण्यात झळकणार आहे.