छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री म्हणून निया शर्मा ओळखली जाते. निया तिच्या बोल्ड फोटोंमुळे आणि व्हिडीओमुळे नेहमीच चर्चेत असते. नियाने नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला असून हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

हा व्हिडीओ नियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत नियाने पांढऱ्या रंगाचं क्रॉप टॉप आणि जीन्स परिधान केली आहे. नेकलेस, बेली बटन रिंग आणि तिच्या रेड लिपस्टीकने सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. नियाा हॉट अंदाजात डान्स करताना दिसत आहे. या व्हिडीओतील कॅप्शनने देखील सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. नियाचा हा व्हिडीओ १ लाख पेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे.

एक हजारो मैं मेरी बेहेना है या मालिकेतून निया घराघरात पोहोचली. मात्र, तिला खरी लोकप्रियता ही जमाई राजा या मालिकेतून मिळाली. नियाची जमाई राजा २.० ही सीरिज नुकतीच प्रदर्शित झाली आहे. या सीरिजसाठी दिलेल्या बोल्ड सीनमुळे निया सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल झाली होती.