आपल्या डान्सच्या मूव्हजने अनेकांची मने जिंकणारी अभिनेत्री म्हणजे नोरा फतेही. नोराचे डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर कायमच चर्चेत असतात. पण सध्या नोरा एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आहे. नोराने शेअर केलेला व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. हा व्हिडीओ पाहून बॉलिवूड अभिनेता वरुण धवनला हसू अनावर झाले आहे.

नोरा ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सतत तिचे व्हिडीओ आणि फोटो चाहत्यांसोबत शेअर करताना दिसते. नुकताच नोराने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमधील तिचा अनोखा बिकिनी लूक पाहून सर्वांनाच हसू अनावर झाले आहे.

आणखी वाचा : कोट्यावधी रुपये कामावूनही ‘हे’ कलाकार राहतात भाड्याच्या घरात

व्हिडीओमध्ये नोराने एक जॅकेट परिधान केले आहे. व्हिडीओच्या बॅकग्राऊंटमध्ये आवाज येतो की पहिले तुम्ही सैल कपडे घाला आणि नंतर बिकिनी घाला. नोरा देखील तसेच करते. पण तिची स्टाइल थोडी हटके आहे. नोरा तिच्या जॅकेटवरच बिकिनी परिधान करते. तिचा हा अनोखा बिकिनी लूक पाहून सर्वांना हसू येते. हा व्हिडीओ शेअर करत तिने ‘मी बिकिनीमध्ये कशी दिसेन हे दाखवत आहे’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे.

नोराचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. चाहत्यांनी तिच्या या व्हिडीओवर लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी देखील कमेंट केली आहे. वरुण धवनला नोराचा हा लूक पाहून हसू अनावर झाले आहे. त्याने कमेंट करत हसण्याचे इमोजी वापरले आहेत.

‘सत्यमेव जयते’ चित्रपटातील ‘दिलबर दिलबर’ या गाण्याच्या रिक्रिएटेड व्हर्जनमधील डान्समुळे नोरा ही खऱ्या अर्थाने प्रकाश झोतात आली. काही दिवसांपूर्वीच नोराचा गुरु रंधावासोबत एक अल्बम ‘ नाच मेरी रानी’ लाँच झाला होता. या अल्बमधील नोराचा डान्स पाहण्यासारखा होता. हा अल्बम यूट्यूबवर सुपरहिट ठरला होता. ‘नाच मेरी रानी’ हा अल्बम यूट्यूबवरील सर्वाधिक पाहिला गेलेला अल्बम ठरला होता.