गेल्या बऱ्याच दिवसांपासून बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा नवरा उद्योगपती राज कुंद्रा चर्चेत आहे. तिच्या पतीवर सुरू असलेल्या आरोपामुळे तिच्यावर बरीच टिका झाली आहे. राज कुंद्रा यांना अटक करण्यात आलेल्या अश्लील चित्रपट निर्मीती प्रकरणामध्ये रोज नव नवीन माहिती समोर येत आहे. मात्र शिल्पा ही पहिली अभिनेत्री नाही जिला तिच्या पतीमुळे अवहेलना झेलावी लागली आहे. अश्या बऱ्याच अभिनेत्री आहेत ज्यांना त्यांच्या पतीमुळे अवहेलना झेलावी लागली होती.
निशा रावल- छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री निशा रावल बरीच चर्चेत आली होती. निशाने तिचा पती करण मेहरावर घरगुती हिंसाच्या आणि विवाहबाह्यसंबंध असल्याचा आरोप केला आहे आणि त्यासाठी करणला पोलिसांनी अटक देखील केली हाती. ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मलिकेमध्ये करण मेहरा प्रमुख भुमिकेत झळकला होता.
मदालसा शर्मा – छोट्या पडद्यावरची लोकप्रिय खलनायिका मदालसाचा पती मिमोहने एका अभिनेत्रीवर बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला होता. मिमोह चक्रवर्तीने हा आरोप फेटाळून लावला आहे. अभिनेत्री मदालसाने २०१८ मध्ये बॉलिवूड अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांचा मुलगा मिमोह चक्रवर्तीशी लग्न केले.
सुझान खान- हृतिक रोशनचं अभिनेत्री बार्बरा मोरी आणि कंगना राणाैवत बरोबर अफेअर असल्याची चर्चा सुरू होती. ही बातमी समोर येताच सुझानला शॉक बसला होता. कालांतराने त्या दोघांचा घटस्फोट झाला. हृतिक- सुझान जरी विभक्त झाले असले तरी त्यांच्या मुलांच्या योग्य संगोपनासाठी ते सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसतात.
जरीना वहाब -जरीना यांचा पती आदित्य पांचोली हे कोणत्या ना कोणत्या कारणमुळे नेहेमीच चर्चेत असतो. त्यामुळे जरीना यांना बऱ्याचदा लोकांच्या टिकेचा सामना करावा लागला आहे. अभिनेत्री जरीना वहाब या अभिनेता सूरज पांचोलीची याची आई आहे.
दिव्या खोसला कुमार- अभिनेत्री, निर्माती, दिग्दर्शक दिव्याचे पती टी-सीरिज कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक भूषण कुमार यांच्यावर एका मॉडेलने बलात्कार केल्याचा आरोप केला होता. भूषण यांनी हा आरोप खोटा असल्याचे स्पष्ट केले होते. भूषण कुमार त्यांच्या खासगी आयुष्यामुळे बऱ्याचदा चर्चेत आले आहेत.
या होत्या काही अभिनेत्री ज्यांना त्यांच्या पतीमुळे नाचक्की सहन करावी लागली होती.