पश्चिम बंगालची प्रसिद्ध अभिनेत्री आणि तृणमूल काँग्रेस पक्षाच्या खासदार नुसरत जहाँ सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असतात. नुसरत कधी त्यांच्या वक्तव्यासाठी तर कधी सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमुळे चर्चेत असतात. नुसरत जहॉं यांनी एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यांचा हा ग्लॅमरस व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

नुसरत यांनी हा व्हिडीओ त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी ४ वेगवेगळ्या प्रकारचे कपडे परिधान केले आहेत आणि त्या कॅट वॉक करताना दिसत आहेत. नुसरत यांनी पहिले पिवळ्या रंगाचे, मग पांढऱ्या, नंतर लाल आणि शेवटी निळ्या रंगाचे कपडे परिधान केले आहेत. व्हिडीओमध्ये नुसरत ग्लॅमरस अंदाजात दिसत आहेत. २०२१ मध्ये तुम्हाला कोणता लूक परिधान करायला आवडेल. अशा आशयाच कॅप्शन नुसरत यांनी या व्हिडीओला दिले आहे. नुसरत यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

नुसरत जहॉं यांनी २०१९मध्ये राजकारणात प्रवेश केला आणि तृणमूल कॉंग्रेसच्या खासदार ठरल्या. नुसरत यांनी ‘वन’ सारख्या अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.