प्रसिद्ध बंगाली अभिनेत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ दोन महिन्यांपूर्वी निखिल जैनसह लग्न बंधनात अडकल्या. त्यानंतर नुसरत या पतीसोबतचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. लग्नाच्या दोन महिन्यानंतर नुसरत यांनी लग्नातील संगीत सोहळ्याचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोंटोमध्ये नुसरत जहॉं अत्यंत सुंदर दिसत आहेत. सध्या त्यांचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
संगीत सोहळ्यादरम्यान नुसरत यांनी गुलाबी आणि लाल रंगाचा लेहेंगा परिधान केला आहे. या ड्रेसमध्ये त्या अतिशय ग्लॅमरल अंदाजात दिसत आहेत. तर दुसरीकडे त्यांचे पती निखिन निळ्या रंगाच्या आउटफिटमध्ये दिसत आहेत. फोटोमध्ये दोघेही नृत्य करताना दिसत आहेत. दरम्यान नुसरत आणि निखिल यांच्यामधील केमिस्ट्री पाहण्यासारखी आहे. नुसरत या महेंदी सोहळ्याचा आनंद लुटताना दिसत आहेत.
सोशल मीडियाने सर्वांत सुंदर खासदार असा किताब दिलेल्या नुसरत यांनी टर्कीमध्ये डेस्टिनेशन वेडिंग केले. खासदार झाल्यानंतर नुसरत यांनी लग्नाची घोषणा केली होती. लग्नानंतर त्यांनी कुंकू, टिकली, सिंधूर असा शृंगारकरुन सोशल मीडियावर फोटो शेअर केले होते. त्यांना या फोटोंवरुन ट्रोल देखील करण्यात आले होते. लग्नासाठी त्यांनी शपथविधी सोहळा चुकवला होता. नुसरत व निखिल यांची भेट गतवर्षी दुर्गा पूजेदरम्यान झाली. यानंतर दोघांत मैत्री झाली आणि पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झाले. काही महिन्यांच्या रिलेशनशिपनंतर दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला.