मिर्झापूरचा तिसरा सिझन ५ जुलैला रिलिज झाला आहे. या सीरिजची चांगलीच चर्चा होते आहे. काही लोकांना ही सीरिज आवडली आहे तर काही लोकांना ही सीरिज पटलेली नाही. मात्र या सीरिजचा चौथा सिझन येणार हेही आता स्पष्ट झालं आहे. अशात अली फजलने मी या सीरिजमध्ये गुड्डू भय्याच्या रोलसाठी पहिली निवड नव्हतो असं म्हटलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मिर्झापूरमधल्या गुड्डूच्या भूमिकेचंं कौतुक

मिर्झापूरमध्ये गुड्डू भय्याची भूमिका अली फजलने साकारली आहे. मात्र या भूमिकेसाठी तो पहिली निवड नव्हता. त्यानेच एका मुलाखतीत याबाबत खुलासा केला आहे. मिर्झापूरमध्ये गुड्डू भय्या हे पात्र अली फजलने साकारलं आहे. या पात्राची चांगलीच चर्चा झाली. कारण गुड्डू भय्या दुसऱ्या सिझनमध्ये गादीवर बसला आहे. तिसऱ्या सिझनमधल्या त्याच्या भूमिकेचंही कौतुक झालं. अशात अली फजलने आपण या भूमिकेसाठी आपण पहिली निवड नव्हतो असं म्हटलं आहे.

हे पण वाचा- Mirzapur Season 3 Review: बुद्धिबळ, रक्तरंजित डावपेच आणि सिंहासनाच्या वर्चस्वाची रंजक कहाणी

लहानपण लखनऊत, महाविद्यालय मुंबईत

“मी लहानपणी लखनऊमध्ये वाढलो आहे. माझे वडील मिडल इस्टच्या एका कंपनीत काम करायचे. मी वडिलांबरोबर जास्त राहिलो नाही. आई, माझे आजी-आजोबा यांच्यात मी मोठा झालो. नंतर मी झेवियर्स महाविद्यालयात आलो. १२ वी झाल्यानंतर एक दिवस वडिलांना फोन करुन सांगितलं की मला पैसे, पॉकेटमनी पाठवू नका. कारण मी माझं बघेन असं सांगितलं. त्यावेळी मी कॉल सेंटरमध्ये काम केलं, विविध कामं केली. मी महाविद्यालयीन काळात व्हॉलीबॉल खेळायचो. माझ्या हाताला दुखापत झालं त्यानंतर मी महाविद्यालयात नाटकात काम केलं. ते शेक्सपिअरचं नाटक होतं. त्यानंतर मी अभिनयाकडे वळलो.” असं अली फजलने सांगितलं.

मिर्झापूरमधली कोणती भूमिका अली फजलला ऑफर झाली होती?

अली फजलने मुलाखतीत सांगितलं, “त्यावेळी गुरुमीत सिंग यांनी मला पाहिलं. त्यांनी मला मिर्झापूरमधला मुन्ना त्रिपाठीचा रोल दिला होता. मात्र मी तो टाळला. त्यांना सांगितलं की माझ्याकडे तारखा नाहीत. मी दुसऱ्या कामांमध्ये व्यग्र आहे. तुम्ही दुसऱ्या कुणाला तरी विचारा. मात्र त्यांच्या लक्षात आलं की मी खोटं बोलतो आहे. कारण माझ्याकडे त्यावेळी काम नव्हतं. गुड्डूचा रोल मला आवडला होता. मी त्यांना सांगितलं. त्यासाठी मी त्यांना गुड्डू कसा चालेल? त्याची बॉडी लँग्वेज कशी असेल? तो काय करेल या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला होता. मी त्यांना पटवून दिलं की गुड्डूची भूमिका करायला आवडेल. त्यानंतर ती भूमिका मला मिळाली.”

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor ali fazal said i was not the first choice of the role guddu bhaiya for guddu pandit in mirzapur scj