संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावत’ चित्रपटाचं जोरदार प्रमोशन पुन्हा एकदा सुरु झालं आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण गुरुवारी चार राज्यांमधील प्रदर्शन बंदीवर सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली, त्यानंतर शुक्रवारी चित्रपटाचे दोन नवीन टीझर प्रदर्शित करण्यात आले. नव्याने प्रदर्शित झालेल्या पहिल्या टीझरमध्ये शाहिद कपूर आणि रणवीर सिंगच्या भूमिकांची झलक पाहायला मिळाली. तर दीपिका पदुकोणने साकारलेल्या महाराणी पद्मावतीच्या भूमिकेला केंद्रस्थानी ठेवून दुसरा टीझर प्रदर्शित करण्यात आला.
या टीझरची सुरुवात शाहिद आणि दीपिकाच्या पहिल्या भेटीपासून होते. महारावल रतन सिंह यांची भूमिका साकारणारा शाहिद जखमी होतो आणि दीपिका म्हणजेच राणी पद्मावती त्यांचे प्राण वाचवते. यामध्ये राणी पद्मावती रणरागिणीच्या रुपातही पाहायला मिळते.
https://twitter.com/Rahulrautwrites/status/954249926107541504
२५ जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ‘पद्मावत’ची उत्सुकता आता शिगेला पोहोचली असून सर्वत्र त्याचीच चर्चा पाहायला मिळत आहे.