आपली मते मांडण्यासाठी सहज उपलब्ध होणारे साधन म्हणजे सोशल मीडिया. अनेकदा सेलिब्रिटींच्या फोटोंना, पोस्टना, मतांना नेटीझन्सकडून ट्रोल केले जाते. प्रियांका चोप्रा आणि दीपिका पदुकोणला तिच्या कपड्यांवरून, रेणुका शहाणे यांना त्यांच्या अमरनाथ यात्रेवरील पोस्टवरून नेटीझन्सनी ट्रोल केल्याचे ताजे उदाहरण आहे. आता पुन्हा एकदा बॉलिवूडच्या ‘मस्तानी’ला म्हणजेच दीपिका पदुकोणला ट्रोल केले गेले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दीपिकाने नुकतेच ‘वॅनिटी फेअर’ नावाच्या मासिकेसाठी फोटोशूट केले. त्याचा फोटो तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला. या ब्लॅक अँड व्हाइट फोटोमध्ये दीपिका खूपच बारीक दिसतेय. यामुळेच नेटीझन्सनी कुपोषित आणि चिकन म्हणत तिची थट्टा केली. इतकेच नाही तर यूझर्सनी तिला जास्त खाऊन वजन वाढवण्याचा सल्लाही दिलाय. काळ्या रंगाच्या ड्रेसमधील दीपिकाच्या या फोटोला एका दिवसात ४ लाख लाईक्स मिळाले असून अडीच हजारापेक्षाही जास्त लोकांनी त्यावर प्रतिक्रिया दिली.

वाचा : क्रिती सनॉनला हवंय ‘तिकीट टू हॉलिवूड’

या फोटोमध्ये दीपिकाच्या गळ्यात सुरेख डायमंड नेकलेससुद्धा पाहायला मिळतोय. मासिकाच्या ज्वेलरी एडिशनसाठी तिने हे फोटोशूट केलेय. एका युझरने तर, ‘आजारी चिकनला कोणी रुग्णालयात दाखल करा… चीपिकाला चिकित्सेची गरज आहे’ अशी प्रतिक्रिया दिली तर दुसऱ्याने, ‘दीपिका आजकाल जेवायचेच विसरत आहे असे वाटतेय,’ अशी उपरोधिक टीका केली. विशेष म्हणजे याच फोटोशूटमधील तिच्या इतर फोटोंची मात्र खूप स्तुती केली जातेय.

दीपिका तिच्या आगामी ‘पद्मावती’ चित्रपटात राणीची भूमिका साकारणार आहे. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित या चित्रपटात रणवीर सिंग अल्लाऊद्दीन खिल्जीची भूमिका साकारणार असून शाहिद कपूरचीही यात महत्त्वाची भूमिका आहे. या वर्षाअखेर हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे कळते.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Padmavati actress deepika padukon trolled on social media for her magazine photo