२०२० या वर्षभरात अनेक सेलिब्रिटींनी लग्नगाठ बांधली. नुकताच अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे यांच्या मुलाचा साखरपुडा पार पडला. प्रियांक शर्माने निर्माते करीन मोरानी यांची मुलगी शाझा मोरानीशी साखरपुडा केला. गेल्या काही वर्षांपासून हे दोघं एकमेकांना डेट करत आहेत. प्रियांक हा अभिनेत्री श्रद्धा कपूरचा चुलत भाऊ आहे.

श्रद्धा कपूचा भाऊ सिद्धांतने सोशल मीडियावर साखरपुड्याचे काही फोटो पोस्ट केले आहेत. ‘तुम्हा दोघांसाठी मी खूप खुश आहे. माझ्या सर्वांत आवडत्या जोडीचं लवकरच लग्न होणार आहे’, असं कॅप्शन देत सिद्धांतने हे प्रियांक-शाझासोबतचे फोटो पोस्ट केले आहेत.

आणखी वाचा : ज्युनिअर अंबानीचं नामकरण; वडील आकाशच्या नावाशी आहे खास कनेक्शन

या साखरपुड्याला शक्ती कपूर, सिद्धांत आणि शिवांगी कोल्हापुरे यांनी हजेरी लावली. मात्र श्रद्धा या कार्यक्रमात कुठेच दिसली नाही. पद्मिनी कोल्हापुरे यांचा मुलगा प्रियांकने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. ‘सब कुशल मंगल’ या चित्रपटात त्याने भूमिका साकारली होती.