बॉलिवूड अभिनेता परेश रावल हे गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या सगळ्यांचे मनोरंजन करत आहेत. परेश रावल यांनी एका खलनायकाच्या भूमिकेपासून कॉमेडीयनच्या भूमिकेपर्यंत अनेक भूमिका साकारल्या आहेत. लवकरच परेश रावल हे फरहान अख्तरच्या ‘तूफान’ या चित्रपटात दिसणार आहेत. काही दिवसांपूर्वी परेश रावल यांचा मुलगा आदित्य रावलने देखील ‘बमफाड’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत परेश यांनी त्यांच्या मुलाच्या पदार्पणा विषयी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.
ज्या प्रमाणे इतर स्टार किड्सची एण्ट्री ही ग्रॅंड असते त्याप्रमाणे परेश यांच्या मुलाची एण्ट्री ग्रॅंड नव्हती. चित्रपट प्रदर्शनाच्या काही दिवसांआधी प्रेक्षकांना आदित्य हा परेश यांचा मुलगा असल्याचे समजले. परेश रावल यांनी नुकतीच ‘इंडियन एक्सप्रेस’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या मुलाच्या बॉलिवूड पदार्पणा विषयी सांगितले आहे.
“मी त्याला माझा मुलगा म्हणून लाँच केले नाही कारण माझ्याकडे तेवढे पैसे नाहीत. माझ्या मुलाला लॉन्च करण्यासाठी तुम्हाला खूप मोठ्या गोष्टींची गरज आहे, माझ्या मुलाला त्याच्या कामामुळे दुसऱ्या ऑफर्स मिळत आहे, याचा मला अभिमान आहे. त्यांनी आदित्यसाठी कोणतीही शिफारस केली नव्हती, असे परेश रावल म्हणाले.
आणखी वाचा : ‘तुला लाज वाटायला हवी, तू मुस्लीम आहेस’, कामाख्या देवीचे दर्शन घेतल्याने सारा झाली ट्रोल
पुढे ते म्हणाले, “हे चांगल नाही का? त्याने मेहनत घेतली आणि त्यामुळे आज लोक त्याला ओळखतात. ‘बमफाड’ चित्रपटातील त्याचे काम लोकांना आवडले आणि आता तो हंसल मेहता सारख्या दिग्दर्शकाबरोबर काम करत आहे. त्याला त्याच्या वडिलांच्या शिफारशीची आवश्यकता नाही.”
आणखी वाचा : ‘तुला हे करावं लागेल…’, ‘मोमो’ने सांगितला कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव
परेश रावल यांचा ‘तूफान’ हा चित्रपट १६ जुलै रोजी अॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित होईल. तर ‘हंगामा २’ हा चित्रपट २३ जुलै रोजी हॉटस्टारवर प्रदर्शित होईल.