बॉलिवूडचा ‘भाईजान’ आणि लाखो लोकांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता सलमान खानने त्याच्या आवडत्या अभिनेत्याची नुकतीच भेट घेतली. ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचा मोठा चाहता असणाऱ्या सलमानने त्यांच्या फार्म हाऊसवर जाऊन त्यांना आश्चर्याचा धक्का दिला. या भेटीचा फोटो स्वतः धर्मेंद्र यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.
सलमानसोबतचा फोटो शेअर करत त्यांनी लिहिलं की, ‘तुझ्या अचानक येण्याने मला खूप आनंद झाला. तू माझ्यासाठी माझ्या मुलासारखा आहेस.’ हाच फोटो त्यांनी इन्स्टाग्रामवरही शेअर केला आहे. धर्मेंद्र आणि सलमान यांनी १९९८ साली ‘प्यार किया तो डरना क्या’ चित्रपटात एकत्र काम केले होते. यात काजोल आणि अरबाज खान यांच्याही भूमिका होत्या.
वाचा : अन् करणने मागितली बिग बींची माफी
माझ्यावरील बायोपिकमध्ये केवळ सलमानच माझी भूमिका साकारण्यासाठी पात्र असल्याचे, धर्मेंद्र यांनी एका मुलाखतीत म्हटले होते. पीटीआयशी बोलताना ते म्हणाले होते की, ‘मला वाटतं तो बायोपिक करू शकतो. तो माझ्यासाठी एक प्रिय व्यक्ती आहे. त्याच्या आणि माझ्या काही सवयींमध्ये साम्य आहे. सलमान आणि त्याच्या सवयींबद्दल तुम्हाला चांगलीच माहिती आहे. तो माझ्यावरच गेला आहे.’
Deeply touched by your surprise visit to the farm today… you will always be a son to me @BeingSalmanKhan pic.twitter.com/2DSEObQYSR
— Dharmendra Deol (@aapkadharam) December 29, 2017
दरम्यान, सलमान सध्या ‘टायगर जिंदा है’ चित्रपटाच्या यशाचा आनंद साजरा करतोय. २०१७ या वर्षातील ‘बाहुबली २’ नंतर सर्वाधिक कमाई करणारा तो दुसरा चित्रपट ठरला आहे. व्यापार विश्लेषक आणि चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी केलेल्या ट्विटनुसार, चित्रपटाने शुक्र. ३४.१०, शनि. ३५.३०, रवि. ४५.५३, सोम. ३६.५४, मंगळ. २१.६०, बुध. १७.५५, गुरु. १५.४२ अशी २०६.०४ कोटी रुपयांची कमाई केली. तेव्हा आता हा चित्रपट ३०० कोटींचा गल्ला जमवतो का, याकडेच अनेकांचं लागून राहिले आहे.