मराठी चित्रपट निर्मिती क्षेत्रात दर्जेदार कलाकृती सादर करण्याचा संकल्प केलेल्या अश्विनी रणजीत दरेकर यांच्या ‘एआरडी एंटरटेमेंट’निर्मित ‘व्हिडिओ पॅलेस’ प्रस्तुत आणि `स्ट्रॉबेरी पिक्चर्स’ सहनिर्मित व मनवा नाईक दिग्दर्शित ‘पोरबाजार’ या सिनेमातील गाण्याची ध्वनिफित नुकतीच मुंबई येथे एका शानदार सोहळ्यात प्रकाशित करण्यात आली. ही ध्वनिफित अभिनेते-दिग्दर्शक सचिन पिळगांवकर आणि महेश मांजरेकर यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आली. या प्रकाशन सोहळ्यात गायक नकाश अजीज आणि जसराज यांनी धमाकेदार परफॉर्मन्स सुद्धा दिले. दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करीत असलेल्या मनवा नाईक यांच्या ‘पोरबाजार’मध्ये अभिनेता अंकुश चौधरी त्याने आत्तापर्यंत न केलेल्या अशा वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. तर या सिनेमासाठी तयार केलेले अभिनेता स्वप्नील जोशी चे प्रमोशनल सॉंग प्रेक्षकांसाठी खास आकर्षण ठरणार आहे. हा बहुचर्चीत सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.
कुणालाही हेवा वाटेल असा पाच तरूण मुलामुलींचा ग्रुप धम्माल-खेळकर मस्ती करत मस्तमौला आयुष्य जगत असतो. अशाच एका बिनधास्त क्षणी त्यांच्या जगण्याला अनपेक्षित कलाटणी आणि त्यांच्या आयुष्यात घडणारी एक रहस्यपूर्ण साहस कथा या सिनेमात उलगडत जाते. तरूणाईचा धमाल सिनेमा असे स्वरूप असलेल्या या सिनेमातून लहान मुलांच्या बाबत घडणा-या एका संघटीत गुन्ह्याबद्दल प्रेक्षकांना जागॄत करून एक मोलाचा सामाजिक संदेशही हा सिनेमा देतो. पोर बाजार’ हा आजच्या तरूणाईचा एक धमाल सिनेमा असून यातून अनेक प्रसिद्ध चेह-यांसोबतच काही नवीन चेहरे दिसणार आहेत. या धमाल कथानकात अभिनेता अंकुश चौधरी आणि अभिनेत्री सई ताम्हणकर या दमदार जोडी सोबतच निर्माते-दिग्दर्शक-अभिनेते महेश मांजरेकर यांचा मुलगा सत्या, अभिनेता अतुल परचुरेंची मुलगी सखील, अभिनेते मनोज जोशींचा मुलगा धर्मज, राम मराठेंची नात स्वरांगी यांच्या मुख्य भूमिका आहेत. सोबतच चित्रा नवाथे, स्वानंद किरकिरे, प्राजक्ता दिघे, कमलाकर नाडकर्णी, शंतनु गव्हाणे, विकास पाटील, अनुराग वोरलीकर यांच्याही महत्वाच्या भूमिका यात आहेत. धमाल स्टारकास्ट आणि धमाल कथानक असलेल्या ‘पोर बाजार’ ची पटकथा आणि संवाद पराग कुलकर्णी यांनी लिहिले आहेत. तर गुरू ठाकूर, श्रीरंग गोडबोले आणि मंदार चोलकर यांनी लिहिलेल्या गीतांना शैलेंद्र बर्वे यांनी संगीत दिले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 25th Aug 2014 रोजी प्रकाशित
‘पोरबाजार’चे शानदार म्युझिक लॉंन्च
नवा नाईक दिग्दर्शित ‘पोरबाजार’ या सिनेमातील गाण्याची ध्वनिफित नुकतीच मुंबई येथे एका शानदार सोहळ्यात प्रकाशित करण्यात आली.
First published on: 25-08-2014 at 08:51 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Por bazaar music launch