अनुष्का शेट्टी हे नाव दाक्षिणात्य सिनेसृष्टीसाठी काही नवीन नाही. खरे तर अनुष्का याआधीच अजय देवगणच्या ‘सिंघम’ सिनेमातून हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण करणार होती. पण मानधनावरुन मतभेद झाल्यामुळे तिने या सिनेमाला नकार दिला. याबद्दल बोलताना अभिनेत्रीने सांगितले की, प्रत्येक गोष्टीची स्वतःची अशी वेळ असते. हिंदी भाषिक प्रेक्षकांनी तिला ‘बाहुबली’च्या दोन्ही भागांमध्ये पाहिले आहे. देवसेना या व्यक्तिरेखेमुळे तिला सिनेरसिकांकडून भरभरून प्रेम मिळाले. हा सिनेमा मूळ तेलगू भाषेत असला तरी तो हिंदीमध्ये डब केला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अरुण गवळीमुळे ढकलली ‘डॅडी’च्या प्रदर्शनाची तारीख

सध्या ती प्रभाससोबतचा आगामी सिनेमा ‘साहो’च्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. ‘डीएनए’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, अनुष्का लवकरच हिंदी सिनेमा करणार आहे. या सिनेमाचे नाव अजून कळले नसून हा सिनेमा कोण दिग्दर्शित करणार आहे हेही गुलदस्त्यात ठेवण्यात आलेय.
सध्या अनुष्का आणि प्रभास आपल्या बॉलिवूड सिनेमासाठी हिंदी भाषा शिकत आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या दोघांची केमिस्ट्री काही वेगळीच आहे. ‘साहो’ सिनेमात या दोघांची प्रेमकहाणी दाखवण्यात येणार आहे. या सिनेमात ते वेस्टर्न लूकमध्ये दिसतील. त्यामुळे दोन्ही कलाकारांना आपले वजन कमी करण्यास सांगितले आहे. अचानक ओढावलेल्या परिस्थितीमुळे संकटात सापडलेल्या मुलाच्या भूमिकेत प्रभास दिसणार असल्याचे कळते. प्रभास आणि अनुष्काने याआधीही तेलगू सिनेमात एकत्र काम केले आहे.

सुनील ग्रोवरबद्दलच्या या गोष्टी माहितीयेत का?

पाच वर्षे ‘बाहुबली’ सिनेमाचे चित्रीकरण सुरू होते. या पाच वर्षांमध्ये सह-कलाकारांमध्ये एक अतूट नातं निर्माण झालं होतं. अनेक मुलाखतींमध्ये कलाकारांनी एकमेकांसोबत असलेल्या नात्याबद्दल खुलेपणानं सांगितलं आहे. प्रभास आणि राणा डग्गुबतीमध्ये सर्वात जास्त सेक्सी कोण आहे? असा प्रश्न जेव्हा अनुष्काला विचारण्यात आला तेव्हा अनुष्काने प्रभासचे नाव घेतले. तर राणाला तिने आपला भाऊ म्हटले. राणा आणि ती एकमेकांना ‘ब्रो’ या नावाने हाक मारतात. एसएस राजामौली दिग्दर्शित ‘बाहुबली २’ या सिनेमाने बॉक्स ऑफिसचे सगळे रेकॉर्ड ब्रेक केले आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prabhas and anushka shetty are learning hindi language for their bollywood movies