एसएस राजामौलीच्या ‘बाहुबली’ सीरिजने प्रभासला prabhas जितकी प्रसिद्धी मिळाली असेल तितकी कोणत्याच चित्रपटाने मिळाली नाही. त्याच्याबद्दलची प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. त्याच्या आगामी ‘साहो’ चित्रपटाबद्दल जाणून घेण्याची प्रेक्षकांना उत्सुकता लागल्यानंतर हा पठ्ठ्या सुट्टीसाठी जवळपास महिनाभर अमेरिकेला गेला होता. आता तो तेथून भारतात परतला असून, लवकरच चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार आहे. काही दिवसांपूर्वीच त्याचा नव्या हेअरकटमधला लूक समोर आला होता. पण, आता त्याचा नवा फोटो जो व्हारयल झाला आहे तो बघून अनेकांनाच धक्का बसला असेल. अमरेंद्र आणि महेंद्र बाहुबलीची भूमिका साकारण्यासाठी प्रभासमने स्वतःमध्ये बरेच बदल केले होते. त्यानंतर त्याने ‘साहो’साठी saaho देखील हेच केले आहे. प्रभासने नव्या लूकसाठी केवळ नवा हेअरकटच नाही केला तर त्याने आता क्लीन शेव्हदेखील केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

PHOTO: फातिमा सना शेखचं हे हॉट फोटोशूट पाहिलं का?

‘बाहुबली’साठी baahubali पाच वर्षे झोकून काम केल्यानंतर प्रभासला सुट्टीची नितांत गरज होती. त्यामुळेच तो महिन्याभरापूर्वी अमेरिकेला रवाना झाला होता. आता त्याचा एक नवीन फोटो व्हायरल झाला असून हा फोटो विमानात काढलेला दिसतो. त्याच्या फॅन क्लबनेच हा फोटो शेअर केल्याच कळतं. फोटो पाहता ‘हाच का तो बाहुबलीमधला प्रभास’ असा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही. तरुणींच्या हृदयाचा ठोका चुकवणाऱ्या तेलगू अभिनेत्याने बिअर्ड लूकला राम राम ठोकला असून क्लीन शेव्ह केली आहे. पण, हा लूक ‘साहो’साठीच आहे का हे अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी तो नक्कीच काहीतरी नवं करण्याच्या प्रयत्नात असल्याचं दिसतं.

‘साहो’ चित्रपट तेलगू, तमिळ आणि हिंदी या तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. स्टंट कॉरिओग्राफीसाठी प्रसिद्ध असलेल्या कीनी बेट्सची या चित्रपटात वर्णी लागली आहे. ‘बाहुबली द कनक्लुजन’ चित्रपटासोबत ‘साहो’चा टीझर दाखविण्यात आला होता. त्यासही प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाल्याचे दिसले.

वाचा : कलाकारांमध्ये क्रेझ लुंगीची…

बाहुबलीची भूमिका साकारण्यासाठी प्रभासला बरेच वजन वाढवावे लागले होते. त्यावेळी त्याचे वजन १०० किलोपेक्षाही अधिक झाल्याचे म्हटले जाते. ‘साहो’साठी आता त्याने वजन कमी केले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुजीथ करणार आहे. इतकेच नव्हे तर चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनसाठी प्रभास स्वतः डब करणार असल्याचे म्हटले जातेय. बॉलिवूड अभिनेता नील नितीन मुकेश यात खलनायकाच्या भूमिकेत दिसेल. जुलैमध्ये चित्रीकरणाला सुरुवात होणार असून, इतर कलाकारांची निवड होणे अद्याप बाकी आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prabhas has shed his bearded look from baahubali is this for his next film saaho