अनेकविध रंजक, आशयप्रधान विषय घेऊन मराठीत अनेक सिनेमे येऊ लागले आणि प्रेक्षकांची मराठी सिनेमा बघण्याची आवड आणखी वाढू लागली. प्रेक्षकांना नवीन कलाकार, मनोरंजक विषय, धमाल गाणी, अभिनयाची जुगलबंदी असे कम्प्लिट मनोरंजनाचे पॅकेज असलेले सिनेमे बघायला मिळत आहेत. त्यामुळेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मराठी सिनेमा गाजतोय. असाच एक प्रेम, रोमांच, धमालमस्ती असलेला सिनेमा म्हणजे ‘प्रेमासाठी coming सून’. मराठी सिनेमांमधील प्रेक्षकांचा लाडका चेहरा अभिनेता आदिनाथ कोठारे आणि त्याच्यासोबत अभिनेत्री नेहा पेंडसे ही गोड जोडी पहिल्यांदाच एकत्र दिसणार असून येत्या १२ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.
आदित्य आणि अंतरा या दोघांची गमतीशीर कथा या सिनेमात रेखाटण्यात आली असून ‘प्रेमासाठी coming सून’ या रोमॅंटिक सिनेमाची निर्मिती अनुपकुमार पोदार, संजय संकला, अमन विधाते, मुलचंद देढिया, निखिल मुरारका आणि वंडरलॅन्ड फिल्म्स यांनी केली असून अंकुर काकटकर यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळलेली आहे. आदिनाथ कोठारे आणि नेहा पेंडसे यांच्यासोबतच अभिनेता जितेंद्र जोशी, विजय पाटकर, अभिनेत्री रेशम टिपणिस, सुहास जोशी, आंचल पोदार यांच्याही या सिनेमात महत्वाच्या भूमिका आहेत.
‘प्रेमासाठी coming सून’ या सिनेमातील संवाद आणि पटकथा चिन्मय कुलकर्णी यांनी लिहिले असून संजय संकला यांनी संकलन केले आहे. प्रेम आणि रहस्य अशा दुहेरी छटा असलेल्या या सिनेमातील गीतेही सुमधूर आहेत. चेतन डांगे यांनी सिनेमाला साजेशी गाणी लिहिली तर त्या सुंदर शब्दांना पंकज पडघन यांनी संगीतबद्ध केले आहे. तर या सिनेमातील गीतांवर नृत्य दिग्दर्शन उमेश जाधव यांनी केले आहे. तर अजित रेड्डी यांनी या सिनेमाची सिनेमटोग्राफर म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. अतिशय रंजक, रहस्यमय, रोमॅन्टिक, साहसी आणि धमाल असलेला हा सिनेमा येत्या १२ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 28th Nov 2014 रोजी प्रकाशित
रहस्य आणि रोमांस यांचा अनोखा प्रवास ‘प्रेमासाठी coming सून’
अनेकविध रंजक, आशयप्रधान विषय घेऊन मराठीत अनेक सिनेमे येऊ लागले आणि प्रेक्षकांची मराठी सिनेमा बघण्याची आवड आणखी वाढू लागली.
First published on: 28-11-2014 at 02:47 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Premasathi coming soon upcoming marathi movie