प्रियांका आणि निक जोनसच्या घरी नवा पाहुणा ; सोशल मीडियावरून चाहत्यांना दिली आनंदाची बातमी, म्हणाली…

सरोगसीद्वारे मुलाला जन्म दिला आहे ; चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

priyanka chopra, nick jonas, priyanka chopra become mother, priyanka chopra baby, priyanka chopra instagram, priyanka chopra age, प्रियांका चोप्रा, निक जोनस, प्रियांका चोप्रा इन्स्टाग्राम, प्रियांका चोप्रा झाली आई, प्रियांका चोप्रा सरोगसी, प्रियांका चोप्रा वय
प्रियांका चोप्रा आणि निक जोनस सरोगसीच्या माध्यमातून आई-बाबा झाले आहेत.

अभिनेत्री प्रियांका चोप्राने शुक्रवारी रात्री एक बातमी शेअर करून तिच्या चाहत्यांना मोठा आनंद दिला. तिने सांगितले की, तिने आणि तिचा पती निक जोनसने सरोगसीद्वारे मुलाला जन्म दिला आहे. प्रियंका आणि निकचे हे पहिलेच अपत्य आहे. २०१८ मध्ये त्यांचा विवाह झालेला आहे. आता प्रियांका आणि निकवर शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे.

प्रियांकाने सोशल मीडियाद्वारे आपल्या चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. निकला टॅग करत इंस्टाग्रामवर एक नोट शेअर करताना प्रियांकाने लिहिले की, “आम्ही सरोगसीच्याद्वारे एका बाळाचे स्वागत केले आहे, हे सांगताना आम्हाला खूप आनंद होत आहे. हे क्षण आमच्यासाठी अतिशय खास आहेत आणि आम्हाला प्रायव्हसीची गरज आहे. कुटुंबासाठी वेळ द्यायचा आहे आहे. आमच्या भावनांचा आदर कराल अशी अपेक्षा आहे. खूप खूप धन्यवाद.” निकनेही हीच पोस्ट त्याच्या सोशल मीडिया पेजवर शेअर केली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Priyanka chopra nick jonas welcome a baby via surrogacy msr

Next Story
“धार्मिक छळ सुरूच आहे”; काश्मिरी पंडितांच्या पलायनाबाबत अमेरिकन अभिनेत्रीचे ट्विट
फोटो गॅलरी