गुप्तहेर हा प्रकार कथा, कादंबऱ्या, चित्रपट आणि मालिकांमुळे नेहमीच लोकांच्या कौतुकाचा आणि उत्सुकतेचा विषय राहिला आहे. म्हणूनच ‘शेरलॉक होम्स’, ‘हक्र्युल पायरो’, ‘जेम्स बॉण्ड’, ‘जिमी कुडो’, ‘मिस जेन मार्पल’ यांसारख्या अनेक गुप्तहेर व्यक्तिरेखांनी चाहत्यांच्या मनावर वर्षांनुवर्षे राज्य केले आहे. याच संकल्पनेच्या आधारावर आलेल्या ‘क्वांटिको’ या मालिकेने पाहता पाहता प्रचंड लोकप्रियता मिळवली. आश्चर्याची बाब म्हणजे या अमेरिकन मालिकेच्या लोकप्रियतेमागे देसी गर्ल ‘प्रियांका चोप्रा’चा सिंहाचा वाटा आहे. परंतु ही मालिका आता बंद होण्याच्या मार्गावर आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘सीआयए’ आणि ‘एफबीआय’ या दोन गुप्तचर संघटनांभोवती फिरणाऱ्या ‘क्वांटिको’चे पहिले सत्र प्रचंड गाजले. यात प्रियांका ‘अ‍ॅलेक्स पेरिश’ या मुख्य भूमिकेत आहे. या मालिकेमुळे ही व्यक्तिरेखा इतकी लोकप्रिय झाली की प्रियांकाने थेट अमेरिकेतील अत्यंत मानाच्या ‘पीपल्स चॉइस पुरस्कारा’वर आपले नाव कोरले. मात्र पहिल्या सत्रात धुमाकूळ घालणाऱ्या ‘क्वांटिको’ला दुसऱ्या सत्रात प्रेक्षकांचा मिश्र प्रतिसाद मिळाला.

कारण कोणत्याही गुप्तहेर मालिकेचे वैशिष्टय़ त्यातील कथानक असते. त्यात जेवढी जास्त अनपेक्षित वळणे येतील तेवढी ती मालिका लोकांना आवडू लागते. परंतु कथानकाचा दर्जा जर कमी झाला तर मात्र त्यातील व्यक्तिरेखा कितीही लोकप्रिय असल्या तरी मालिकेला आपला गाशा गुंडाळावा लागतोच. असाच काहीसा प्रकार ‘क्वांटिको’ या मालिकेच्या बाबतीत झाला आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Priyanka chopra quantico american television series hollywood katta part