सध्या ‘क्वांटिको २’ या सिरीजच्या चित्रिकरणाच्या निमित्ताने अभिनेत्री प्रियांका चोप्रा चर्चेत आली आहे. ‘क्वांटिको’ या सिरीजच्या पहिल्या पर्वाला मिळालेल्या यशानंतर पुढच्या पर्वातही प्रियांकाचीच नि:शंक वर्णी लागली. त्यामुळे देसी गर्लच्या विदेश वाऱ्यांमध्ये वाढ झाली आहे असेच म्हणावे लागेल. आंतरराष्ट्रीय पातळीवरील चित्रपटविश्वातही प्रियांकाच्या नावाची चर्चा आहेत. असे असताना बॉलिवूडमध्ये मात्र सध्या तिचा कोणताही चित्रपट मार्गस्थ झाला नसल्यामुळे चाहत्यांमध्ये नाराजी आहे. पण प्रियांका तिच्या चाहत्यांना तक्रारीची संधी देताना दिसत नाहिये. ‘पिगी चॉप्स’ ने नुकताच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये प्रियांका एका सुरेखशा ‘बॅकलेस गाऊन’मध्ये दिसत आहे.
प्रियांका तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर बरीच सक्रीय असते. त्यामुळे तिने शेअर केलेला हा ‘बॅकलेस लूक’ सध्या अनेकांच्याच पसंतीला उतरत आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर प्रियांकाच्या अमेरिकेतील घराचे काही फोटो व्हायरल झाले होते. तसेच ‘फोर्ब्स’कडून जाहीर करण्यात येणाऱ्या जगात सगळ्यात जास्त कमाई करणाऱ्या टिव्ही अभिनेत्रींमध्ये प्रियांका आठव्या स्थानावर आहे. गेल्यावर्षी एबीसीच्या ‘क्वांटिको’मधून आपल्या आंतरराष्ट्रीय करिअरला सुरुवात करणाऱ्या प्रियांकाने या मालिकेतून १.१ कोटी डॉलर एवढी कमाई केली आहे.
वाचा: ‘देसी गर्ल’चा विदेशी आशियाना..
‘क्वांटिको २’ च्या चित्रिकरणात व्यस्त असणारी प्रियांका एका नव्या अंदाजात रसिकांसमोर येणार आहे. या सिरीजमध्ये तिच्यासह जॅक मॅकलाफलिन, जोहाना ब्रॅडी आणि यास्मिन अल मास्री यांच्याही भूमिका आहेत. याव्यतिरीक्त प्रियांका ‘बेवॉच’ या चित्रपटासह हॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहे. या चित्रपटात अलेक्झांड्रा दद्दारिओ, इलफेनेश हॅडेरा आणि केली या अभिनेत्री तसेच ड्वेन जॉन्सन (रॉक), झॅक एफरॉन, जॉन बॅस हे कलाकारही झळकणार आहेत. येणाऱ्या काळात प्रियांकाच्या अभिनयाचा चढता आलेख पाहणे अनेकांसाठी औत्सुक्याचे ठरणार आहे यात शंकाच नाही.
वाचा: जगातल्या महागड्या टिव्ही अभिनेत्रींमध्ये आता प्रियांका चोप्राही
A photo posted by Priyanka Chopra (@priyankachopra) on