पुनीत बालन स्टुडिओजचा ‘द हिंदू बॉय’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला

अलीकडेच ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट खूप गाजला आहे, मला आशा आहे, की ‘द हिंदू बॉय’ हा चित्रपटही प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.

पुणे : ‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटाच्या यशानंतर निर्माता पुनीत बालन ‘द हिंदू बॉय’ हा नवा चित्रपट घेऊन येत आहेत. काश्मिरी पंडितांचे स्थान काय आहे, सध्या त्यांना कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागतो हे या चित्रपटात मांडण्यात आले असून, हिंदीतील लोकप्रिय अभिनेता शरद मल्होत्रा मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

‘नागिन ५’, ‘विद्रोही’, ‘एक तेरा साथ’, ‘कसम’, ‘बनू मैं तेरी दुल्हन’ यांसारख्या मालिका आणि चित्रपटांमुळे शरद मल्होत्रा हे नाव प्रेक्षकांच्या परिचयाचे आहे. ‘द हिंदू बॉय’ चित्रपटाची पहिली झलक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. एका हिंदू पंडित तरुण मुलाला त्याच्या संरक्षणासाठी म्हणून काश्मीरमधून बाहेर पाठवण्यात येते आणि मग त्याला काय अनुभव येतो, तीस वर्षांनी तो आपल्या घरी परतल्यावर त्याचे काय होते, याचा परामर्श या चित्रपटाच्या कथेतून मांडला गेला आहे. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन शाहनवाज बकाल यांचे असून, विजय अकेला यांच्या गीतांना गायक अविक दोजन चटर्जी यांनी संगीत दिले आहे. या चित्रपटाबद्दल पुनीत बालन म्हणाले, की मी अनेकदा काश्मीरला जातो आणि तेथील लोकांच्या वेदना मी खूप जवळून पाहिल्या आहेत. मला नेहमीच त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची इच्छा होती आणि ‘द हिंदू बॉय’ या चित्रपटाची निर्मिती करायचे ठरवले. अलीकडेच ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट खूप गाजला आहे, मला आशा आहे, की ‘द हिंदू बॉय’ हा चित्रपटही प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Producer punit balan is all set to come up with a new bollywood film the hindu boy zws

Next Story
अभिनेत्री हृता दुर्गुळे अडकली विवाहबंधनात, समोर आला लग्नाचा पहिला फोटो
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी