धर्मेंद्रने सनी देओलच्या रुपेरी पदार्पणसाठी दिग्दर्शक म्हणून राहुल रवैलचीच निवड केली. त्यातून ‘बेताब’ बनला. त्याची पहिली ट्रायल पाहून धर्मेंद्रने तब्बल चाळीस दिवसाचे रिशूटींग सुचवले. पिक्चर पैसो से नही दिल से बनती है हे तेव्हाचे धर्मेन्द्रचे म्हणणे आजही सांगितले जाते. राहुलच्या दिग्दर्शनातील ‘गुनहगार’मधे रिशी कपूर व परवीन बाबी अशी हिट जोडी असूनही तो मुंबईसारख्या अनेक मोठ्या शहरात प्रदर्शित झालाच नाही. ‘अर्जुन’, ‘डक्केत’, ‘योद्धा’ अशा आणखीन काही चित्रपटांबद्दल असेच काही चांगले व वाईटही आहे. त्या खेळात म्हणा वा गोंधळात त्याची कारकीर्द गुरफटून गेली. त्यानंतर दिग्दर्शक व कलाकारांचीही पुढची पिढीदेखिल आली. पण राहुल रवैल अपेक्षित उंचीपासून मात्र दुरच राहिला. अरेरे त्याच्या कर्तृत्वाला थोडीशी नशिबाची साथ मिळायला हवी होती.
दिलीप ठाकूर
संग्रहित लेख, दिनांक 30th Sep 2016 रोजी प्रकाशित
फ्लॅशबॅक : सुदैवी तेव्हढाच दुर्दैवी
काही काही माणसाना नशीब साथ देता देताच त्यासह दुर्दैवही त्याना आडवे येते...
Written by लोकसत्ता टीम

First published on: 30-09-2016 at 01:05 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rahul rawail