रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ मालिकेत सुग्रीव ही भूमिका साकारणाऱ्या श्याम सुंदर यांचे काल ९ एप्रिल रोजी निधन झाले आहे. ८० वर्षांचे श्याम सुदंर गेल्या काही दिवसांपासून कर्करोगाशी झुंज देत होते. या घटनेने संपूर्ण कलाविश्वात शोककळा पसरली आहे. पण लॉकडाउनमुळे त्यांचे अस्थी विसर्जन होऊ शकले नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

श्याम हे त्यांच्या अखेरच्या दिवसांमध्ये ही रामाच्या भक्तीत लीन झाले होते. रामचरित मानसचे अध्याय वाचतानाच त्यांनी प्राण सोडला असल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले आहे. पण आता त्यांचे अस्थी विसर्जन करण्यासाठी त्यांचे कुटुंबीय लॉकडाउन संपण्याची वाट पाहात आहेत. गेल्या २० वर्षांपासून श्याम हे कालका हाउसिंग बोर्ड कॉलनीमध्ये कुटुंबीयांसोबत राहत होते.

श्याम सुंदर यांनी ‘त्रिमूर्ति’ , ‘छैला बाबू’ आणि ‘हीर रांझा’ या चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच ‘जय हनुमान’ या चित्रपटातही त्यांनी हनुमानाची भूमिका साकारली होती. पण रामायणातील ‘सुग्रीव’ या मालिकेने त्यांना लोकप्रियता मिळवून दिली होती.

श्याम यांच्या मृत्यूनंतर ‘रामायण’ मालिकेत रामाची भूमिका साकारणारे अभिनेते अरुण गोविल यांनी ट्विटरद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली. ‘श्याम सुंदर यांच्या निधनाचे वृत्त कळताच फार दु:ख झाले. ते सज्जन व्यक्ती होते. त्यांच्या आत्म्यास शांती मिळो’, असे ट्विट अरुण गोविल यांनी केले होते. नंतर सुनील लहरी यांनीसुद्धा ट्विट करत श्रद्धांजली वाहिली होती.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ramayans surgreev aka shyam sundar ashes immersion on hold avb