फिटनेसच्या बाबतीत अनेकजण सजग असतात. चित्रपटसृष्टीतील तारेतारकांचा आदर्श घेत कित्येक तरुण- तरुणी आपला ‘डे प्लॅन’ तयार करतात. मराठी सिनेसृष्टीदेखील यात मागे राहिली नाही. आपल्या चाहत्यांना डाएट आणि जिमबद्दल योग्य ते मार्गदर्शन करताना मराठी कलाकार दिसत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आपल्या चाहत्यांना प्रत्येक गोष्टीचे अपडेट्स देण्यासाठी हे कलाकार सोशल मीडिया सक्रीय असतात. एखादी पोस्ट, व्हिडिओ किंवा सोशल मीडियावर लाइव्ह येऊन चाहत्यांना रोजच्या जीवनातील फिटनेसबद्दल चाहत्यांना माहिती देत असतात. अभिनेत्री रीना अगरवालसुद्धा अशाचप्रकारे सोशल मीडियाच्या आधारे चाहत्यांशी जोडली गेली आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच सोमवारी ती ‘मंडे मोटिव्हेशन’ या हॅशटॅग अंतर्गत आपल्या चाहत्यांसाठी प्रेरणादायी विचारांचे पोस्ट अपलोड करते. त्याचसोबत खाण्यापिण्याच्या उत्तम सवयी असो किंवा व्यायामाचे टीप्स पोस्ट करताना दिसते.

वाचा : कपिलकडून ‘ती’ चूक पुन्हा एकदा

आपलं शरीर हे आपल्या जीवनशैलीचं प्रतिबिंब असतं, असं कॅप्शन देत तिने नुकताच व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये ती जिममध्ये बॅक वर्कआऊट करताना पाहायला मिळत आहे. निरोगी आणि सृदृढ राहण्यासाठी नियमितपणे व्यामाम करावा परंतु अतिरिक्त डाएट आणि न झेपणारा व्यायामसुद्धा आपल्या जीवावर बेतू शकतो असं तिचं म्हणणं आहे. सध्या रीनाच्या ‘फिटनेस मंत्र’ला चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

रीनाने मराठी चित्रपटांसोबतच बॉलिवूडमध्येही काम केलं आहे. आमिर खानच्या ‘तलाश’, राजकुमार रावच्या ‘बहन होगी तेरी’ यांसारख्या चित्रपटांमध्ये तिने भूमिका साकारली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Reena aggarwal shares fitness tips with fans