अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्युप्रकरणी आणखी एक माहिती समोर आली आहे. सुशांतच्या आत्महत्येपूर्वी कथित प्रेयसी रिया चक्रवर्तीने मुंबईत दोन फ्लॅट खरेदी केले होते. हे दोन्ही फ्लॅट खारमध्ये घेतले आहेत. याप्रकरणी ईडी चौकशी करणार असून ते लवकरच याविषयी रियाची चौकशी करणार आहेत,असं ‘इंडिया टुडे’च्या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबईतील खार या परिसरात अनेक उच्चभ्रु नागरिक राहत असून येथील जागेच्या आणि घराच्या किंमती प्रचंड आहेत. अशा ठिकाणी रियाने दोन फ्लॅट घेणं ही साऱ्यांसाठीच आश्चर्याची बाब असल्याचं दिसून येत आहे. रियाने करिअरमध्ये फारसं यश मिळवलं नसतांना तिच्याकडे इतके पैसे आले कुठून हा नवा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे आता ईडी रियाची चौकशी करणार असल्याचं म्हटलं जात आहे.

गेल्या चार वर्षांमध्ये सुशांतच्या खात्यातून जवळपास ५० कोटी रुपयांची रक्कम काढण्यात आली होती. परंतु, या चार वर्षांच्या कालावधीत सुशांतने एकही घर किंवा अन्य कोणत्याही प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक केली नव्हती. तर दुसरीकडे याच काळात रियाने बराचसा पैसा प्रॉपर्टी खरेदी करण्यात वापरला. विशेष म्हणजे वर्षाला १५ ते १७ लाख रुपयांची कमाई करणारी रिया १-२ वर्षांमध्ये कोटयवधी किंमतींचे फ्लॅट कसे काय घेऊ शकते हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

दरम्यान, नवी मुंबईमध्ये रियाच्या नावावर एक फ्लॅट आहे. तर मुंबईतील खार येथे असलेला फ्लॅट रियाच्या वडिलांच्या नाववर रजिस्टर आहे. तसंच नवी मुंबईत सुशांतच्या दोन कंपन्या असून त्यादेखील रियाच्या वडिलांच्या नावे असल्याचं सांगण्यात येत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rhea chakraborty bought two expensive flats in mumbai before sushant singh rajput death ssj