सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी मुख्य संशयित आरोपी म्हणून अभिनेत्री रिया चक्रवर्तीकडे पाहिलं जात आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर कलाविश्वातील ड्रग्स प्रकरण समोर आलं होतं. यात रिया आणि तिच्या भावाचं नाव उघड झालं होतं. सध्या रियाची जामीनावर सुटका करण्यात आली आहे. मात्र, तिच्या अडचणींमध्ये आणखीनच वाढ झाल्याचं दिसून येत आहे. सध्या रिया राहण्यासाठी नवीन घर शोधत असल्याचं सांगण्यात येत आहे.

विरल भैय्यानी यांच्या इन्स्टाग्रामवर रियाच्या आई- वडिलांचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये रियाचे कुटुंबीय नव्या घराच्या शोधात असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे रिया तिच्या कुटुंबीयांसोबत लवकरच नव्या घरात शिफ्ट होईल असं सांगण्यात येत आहे. सध्या रियाच्या आई-वडिलांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ मुंबईतील खार येथील असल्याचं सांगण्यात येत आहे.

पाहा : रसिका सुनीलचा ‘हॉट’ अंदाज, फोटो पाहून तुम्हीही व्हाल ‘क्लीन बोल्ड’

 दरम्यान, सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी रियावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. याप्रकरणी तिला तुरुंगवासाची शिक्षादेखील झाली होती. सध्या रियाची जामीनावर सुटका करण्यात आली आहे.