‘छिछोरे’, ‘एम. एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी’, ‘काय पो छे’ यांसारखे अनेक सुपरहिट चित्रपट देणारा बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग रजपूत सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. तो नेहमीच आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहाण्यासाठी सोशल मीडियावर विविध प्रकारच्या पोस्ट करताना दिसतो. परंतु यावेळी सुशांत त्याच्या कुठल्याही पोस्टमुळे नव्हे तर त्याच्या नव्या गर्लफ्रेंडमुळे चर्चेत आहे.
अवश्य वाचा – प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल.. पाहा भारत वि. जपान सामन्याची चित्रमय झलक
अवश्य वाचा – हे कलाकार साकारणार ’83’ च्या विजयाचे शिल्पकार
होय, सुशांतच्या आयुष्यात एका नव्या तरुणीचे आगमन झाले आहे. ही तरुणी प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री रेखा चक्रवर्ती आहे. तिने सुशांतच्या वाढदिवसानिमित्ताने इन्स्टाग्रामवर दोघांचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोवर तिने आपल्या खास अंदाजात सुशांतला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या फोटोवरुनच दोघांच्या रिलेशलनशिपच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. अर्थात सुशांत व रेखा दोघांनीही त्यांच्या रिलेशनशिपबाबत अधिकृतरित्या कुठलीही घोषणा केलेली नाही. मात्र त्यांनी ज्या प्रकारचे फोटोशूट केले आहे, त्यावरुन दोघे एकमेकांना नक्कीच डेट करत असल्याच्या शक्यता वर्तवण्यात येत आहेत.
यापूर्वी सुशांत टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडेला डेट करत होता. त्यांचे लग्न देखील होणार होते. परंतु सुशांतच्या आयुष्यात अभिनेत्री क्रिती सॅनॉन आल्यामुळे त्यांचे ब्रेकअप झाले. पुढे त्याचे क्रिती बरोबरही ब्रेकअप झाले. आता त्याच्या आयुष्यात रेखा चक्रवर्ती आल्याचे म्हटले जात आहे.