बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने १४ जून रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याने नैराश्यामध्ये इतके टोकाचे पाऊल उचलले असल्याचे म्हटले जात आहे. पण अद्याप अशी अधिकृत माहिती समोर आलेली नाही. आज सुशांतच्या निधनाला एक महिना झाला आहे. दरम्यान सुशांतची कथित गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीने तिचा व्हॉट्सअ‍ॅप डीपी बदलला असून तिचा आणि सुशांतचा फोटो ठेवला आहे.

सुशांतच्या निधनाने रियाला धक्का बसला होता. ती सोशल मीडियापासून दूर होती. तसेच तिने इन्स्टाग्रामवर तिचा कमेंट सेक्शन प्रायवेट केला होता. आता सुशांतच्या आठवणीने भावूक झालेल्या रियाने तिच्या व्हॉट्सअ‍ॅपचा डीपी बदलला असून तिचा आणि सुशांतचा फोटो ठेवला आहे. या फोटोमध्ये दोघेही अतिशय आनंदी असल्याचे दिसत आहे.

पाहा : सुशांतच्या आत्महत्येनंतर सोशल मीडियावर चर्चेत असणारी रिया चक्रवर्ती आहे तरी कोण?

सुशांतने १४ जून रोजी त्याच्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. सुशांतच्या आत्महत्येनंतर पोलिसांनी कलाविश्वातील अनेकांची चौकशी केली असून त्यात सुशांत संदर्भातील अनेक गोष्टींची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी आतापर्यंत २८ जणांचा जबाब नोंदविला आहे.