बॉलिवूड अभिनेत्री रिचा चड्ढा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून ती कायम चर्चेत असते. यावेळी रिचा तिच्या पहिल्या फोटोशूटमुळे चर्चेत आहे. रिचाने तिच्या करिअरमधील पहिला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
रिचाने मॉडलींग क्षेत्रातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. त्यावेळी तिने आपल्या करिअरमधील पहिले फोटोशूट केले होते. या फोटोशूटमधील एक फोटो रिचाने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. हा फोटो जवळपास १५ वर्ष जुना आहे. या फोटोमध्ये तिने गुलाबी रंगाचा फ्रॉक परिधान केला आहे. रिचाची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.
२००८ साली प्रदर्शित झालेल्या ‘ओय लक्की लक्की ओय’ या चित्रपटातून रिचाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. २०१२ साली प्रदर्शित झालेल्या ‘गँग्स ऑफ वासेपुर’ या चित्रपटाने तिला खरी लोकप्रियता मिळवून दिली. त्यानंतर तिने ‘फुकरे’, ‘पंगा’, ‘तमाचे’, ‘मसान’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले. सध्या रिचा बॉलिवूडमधील आघाडिच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते.