पहिल्याच चित्रपटाने अफाट लोकप्रियता मिळवून देणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरु. रिंकूने नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’ चित्रपटातून अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत रिंकूला एक वेगळी ओळख निर्माण करुन दिली आहे. या पहिल्यावहिल्याच चित्रपटातून रिंकूने अनेकांच्या मनात घर केले.
रिंकू सोशल मीडियावर सतत सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधत असते. तसेच रिंकू इन्स्टाग्राम, फेसबुकवर तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत तिच्या दिलखेचक अंदानी लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य करत असते. नुकताच रिंकूने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती एका गोंडस लहान बाळाशी खेळताना दिसत आहे. पण हे बाळ नेमकं कोणाचं आहे? त्याच नाव काय आहे? हे अद्याप समोर आलेलं नाही. पण तिच्या या व्हिडीओवर चाहत्यांच्या लाईकचा वर्षाव मात्र नक्की झाला आहे.
रिंकूचा लवकरच ‘मेकअप’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने रिंकू आणि अभिनेता चिन्मय उदगीरक ही जोडी पहिल्यांदाच एकत्र पडद्यावर पाहायला मिळणार आहे. रिंकू या चित्रपटात दोन वेगवेगळ्या भूमिकांमध्ये पाहायला मिळणार आहे.७ फेब्रुवारी रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
याव्यतिरिक्त रिंकू अभिनेता ताहिर शब्बीरसोबत ‘100’ या वेब सीरिजमध्ये झळकणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. ताहिरने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवर रिंकूचा फोटो पोस्ट केला होता. त्याने पोस्ट केलेल्या फोटोंवरुन रिंकू वेब सीरिजमध्ये दिसणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. रिंकूच्या आगामी वेब सीरिजचे चित्रीकरण माटुंगा येथे सुरु असून या सीरिजमध्ये बॉलिवूड अभिनेत्री लारा दत्ता देखील दिसणार आहे. लारा दत्ता आणि रिंकू राजगुरु या वेब सीरिजच्या माध्यमातून डिजिटल प्लॅटफॉर्मवर पदार्पण करणार आहेत. ही वेब सीरिज हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे.