बॉलिवूड अभिनेता ऋषी कपूर नेहमीच वादग्रस्त वक्तव्य किंवा त्यांच्या ट्विटसाठी चर्चेत असतात. जणू एकप्रकारे स्वतःहूनच वाद ओढावून घेण्याची त्यांना आता सवय झाली असल्याचे दिसते. काल ख्रिसमसच्या औचित्यावरही त्यांनी एक ट्विट केले. मात्र, या ट्विटमुळे त्यांना शुभेच्छा सोडाच उलट टीकाच सहन कराव्या लागल्या.

वाचा : भारताचा नवा चेहरा दाखवणारा ‘मॅडमॅन पॅडमॅन’

झालं असं की, ऋषी कपूर यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून सर्वांना ख्रिसमसच्या शुभेच्छा देत एक फोटो ट्विट केला. पण, हा फोटो लोकांच्या काही पचनी पडला नाही. या फोटोत एक मुसलमान व्यक्ती एका साधूच्या ग्लासमध्ये दारू ओतताना दिसतो. फोटोसह त्यांनी लिहिलं की, “याला म्हणतात धर्म, भावनांमध्ये विभक्त पण बाटलीसाठी एकत्र. मेरी ख्रिसमस.’

हा एक फेक फोटो असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. तसेच, या फोटोत पाणीच्या बाटलीऐवजी दारूची बाटली मॉर्फ करण्यात आल्याचेही म्हटले आहे. त्यामुळे हा फोटो पाहताच नेटीझन्सचा पारा चढला. काहींनी खरा फोटो शेअर करत तुम्ही असं काहीतरी खोटं आणि नकारात्मक समाजात पसरवू नका असे म्हटले. तर, काहींनी ऋषी यांचे अकाऊंट बंद करण्याची मागणीदेखील केली.

वाचा : पहाटे ३ पर्यंत चालणाऱ्या विरुष्काच्या रिसेप्शनमध्ये इतका खर्च होणार?

https://twitter.com/merabharat2011/status/945163593279979520

https://twitter.com/merabharat2011/status/945162821087633408