बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय कपल म्हणजे अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूजा. ते दोघेही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. ते सतत फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांशी गप्पा मारताना दिसतात. नुकताच जेनेलियाने शेअर केलेला मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये जेनेलियाने रितेशची धुलाई केली आहे.

जेनेलियाने तिच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये रितेश देशमुख अभिनेत्री प्रिती झिंटाला मिठा मारतो आणि तिच्याशी गप्पा मारताना दिसतो. त्याचवेळी जेनेलिया तेथे मागे उभी असते. ते पाहून जेनेलियाला राग येतो आणि घरी पोहोचल्यावर ती रितेशची चांगली धुलाई करत असल्याचे दाखवण्यात आले आहे. त्यांचा हा मजेशीर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. अनेकांनी यावर कमेंट केल्या आहेत.

हा व्हिडीओ शेअर करत जेनेलियाने छान असे कॅप्शन दिले आहे. ‘व्हायरल व्हिडीओमधील प्रेमासाठी… रितेश आणि क्यूट प्रितीसाठी’ या आशयाचे कॅप्शन तिने दिले आहे.

बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडींपैकी एक म्हणून रितेश आणि जेनेलियाकडे पाहिलं जातं. ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटात एकत्र काम असताना हे दोघे रिलेशनशिपमध्ये आले. त्यानंतर ३ फेब्रुवारी २०१२ मध्ये ते लग्नाच्या पवित्र बंधनात अडकले. रितेश आणि जेनेलिया सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. ते नेहमीच सोशल मीडियवर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहतात.