दिग्दर्शक रोहित शेट्टी हा सलमान खान आणि प्रभास या दोन आघाडीच्या अभिनेत्यांना एका चित्रपटातून एकत्र आणणार असल्याची चर्चा सध्या होतेय. सलमान आणि प्रभास हे दोन्ही अभिनेते एकाच चित्रपटात स्क्रीन शेअर करणार असल्यामुळे चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत होतं. मात्र रोहित शेट्टीने ही अफवा असल्याचं स्पष्ट केलंय.

‘ही खोटी बातमी आहे. एका कार्यक्रमाच्या शूटींगसाठी मी सध्या स्पेनमध्ये आहे आणि ही अफवा कुठून पसरतेय याची मला काहीच कल्पना नाही’, असं रोहित शेट्टीने स्पष्ट केलंय. त्यामुळे सलमान आणि प्रभासला एकत्र पाहण्याची प्रेक्षकांची इच्छा सध्या तरी पूर्ण होणार नाही असंच चित्र पाहायला मिळतंय.

VIDEO : तिला ‘आय लव्ह यू’ म्हणताच कतरिनाने रणबीरला लगावली चपराक

रोहित शेट्टी सध्या आगामी चित्रपट ‘गोलमाल अगेन’च्या दिग्दर्शनात व्यस्त आहे. उटीमध्ये या चित्रपटाची शूटींग सुरू असून दिवाळीत हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. तर प्रभास आगामी चित्रपट ‘साहो’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात ‘बाहुबली’ची सहकलाकार अनुष्का शेट्टीसुद्धा भूमिका साकारणार आहे. सलमान सध्या ‘ट्युबलाइट’च्या प्रदर्शनासाठी सज्ज झालाय आणि अली अब्बास झफर यांच्या ‘टायगर झिंदा है’ चित्रपटातसुद्धा भूमिका साकारताना दिसणार आहे.