अभिनेत्री सागरिका घाटगे आणि क्रिकेटर झहीर खानने २३ नोव्हेंबरला नोंदणी पद्धतीने लग्न केले. इतर सेलिब्रिटींप्रमाणे सागरिका – झहीरसुद्धा मोठ्या थाटामाटात लग्न करतील असे वाटत होते. पण, या दोघांनी कोणाताही गाजावाजा न करता अगदी खासगी पद्धतीने कोर्ट मॅरेज करण्यास प्राधान्य दिले. नोंदणी पद्धतीने लग्न केल्यानंतर लगेचच त्यांनी सेंट रेजिस येथे आपल्या निकटवर्तीयांसाठी आणि मित्रमंडळींकरिता कॉकटेल पार्टी ठेवली होती.
PHOTOS वाचा : आमिर-किरणने थीम पार्कमध्ये साजरा केला आझादचा वाढदिवस
या जोडप्याने साध्या पद्धतीने लग्न केले असले तरी मेहंदी, संगीत आणि इतर कार्यक्रम अगदी थाटात साजरे केले. काल त्यांच्या लग्नाचे ग्रॅण्ड रिसेप्शनही झाले. कुलाब्यातील ताज येथे या आलिशान पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. पारंपरिक पोशाखात हे नवदाम्पत्य खुलून दिसत होते यात शंका नाही. यावेळी, झहीरने निळ्या रंगाचा बंदगळा कुर्ता घातला होता तर सागरिकाने आयव्होरी आणि सब्यासाचीने डिझाइन केलेला सुंदर लेहंगा घातला होता. त्यावर तिने तिचा लूक पूर्ण करण्यासाठी साजेसे सोन्याचे भरजरी दागिने घातले होते.
वाचा : आणखी एक प्रसिद्ध मराठी अभिनेता अडकणार लग्नाच्या बेडीत
रिसेप्शनला उपस्थित राहिलेल्यांचे फोटो सोशल मीडियावर पाहावयास मिळत आहेत. क्रिकेट आणि मनोरंजन विश्वातील सेलिब्रिटींनी या सोहळ्याला उपस्थिती लावली होती. माजी विश्वसुंदरी आणि अभिनेत्री सुष्मिता सेन, बिना ककसुद्धा नवदाम्पत्याला शुभेच्छा देण्यासाठी गेल्या होत्या.