सैफ अली खान आणि त्याची पूर्वाश्रमीची पत्नी अमृता सिंग यांच्या नात्यात दुरावा येऊन आता बरीच वर्षे उलटली असली तरीही सध्याच्या घडीला त्यांची नावं, त्यांचं नातं पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरत आहे. यावेळी त्यांच नातं चर्चेत येण्याचं कारण आहे सैफ- अमृताची मुलगी सारा अली खान. सेलिब्रिटींच्या मुला-मुलींच्या यादीत साराचं नाव बऱ्याचदा पुढे असतं. सध्याच्या घडीला ती बॉलिवूड पदार्पणासाठी तयारी करत आहे. पण, खासगी आयुष्यामुळेही सारावर अनेकांच्या नजरा खिळल्या आहेत. सारा आणि अनिल कपूरचा मुलगा हर्षवर्धनमध्ये असणाऱ्या रिलेशनशिपमुळे सध्या अमृता सिंगही चर्चेत आहे.
आपल्या मुलीच्या या अशा रिलेशनशिपमुळे अमृता सध्या करिनावर फार नाराज असल्याचं वृत्त ‘फिल्मीबीट’ या वेबसाइटने प्रसिद्ध केलं आहे. सारा- हर्षला डेट करण्याची परवानगी दिल्यामुळे अमृता करिनावर नाराज असल्याचं म्हटलं जातंय. त्याशिवाय साराच्या अफेअरबद्दल सध्या सुरु असणाऱ्या अफवा पाहता अमृताने त्यावरही नाराजी व्यक्त केली.
वाचा : रोल मिळवण्यासाठी अनुपम खेर यांनी कोणाला केले १२ फोन
इतकच नव्हे तर, हर्षवर्धनचा भूतकाळ आणि इतर मॉडेल्स, अभिनेत्रींसोबत जोडलं जाणारं त्याचं नाव पाहता अमृताला साराची काळजी वाटत असल्याचंही म्हटलं जात आहे. अमृताने स्वत:च्या वैवाहिक जीवनात आलेल्या अडथळ्यांच्या जोरावर साराला सजग केलं. अमृताने अनिल कपूरसोबत याविषयी चर्चाही केली असंही म्हटलं जातंय. मुख्य म्हणजे यावेळी तिने थेट शब्दांमध्ये याविषयाला हात न घालता अप्रत्यक्षपणे तिने अनिलसमोर आपलं मत मांडलं. सारा- हर्षवर्धनच्या या नात्यामध्ये सैफिना महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. पण, अमृताने मात्र साराला तिच्या या अशा वागण्याबद्दल सक्त ताकिद दिल्याची सध्या चर्चा आहे. त्यामुळे तेव्हा आता सारा तिच्या आईचं ऐकून काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, सैफची ही लेक अभिनेता सुशांत सिंग राजपूतसोबत स्क्रीन शेअर करण्यासाठी सज्ज झाली असून ‘केदारनाथ’ या चित्रपटातून ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.