मराठी चित्रपटसृष्टीमधील काही चित्रपट असे आहेत ज्यांनी चाहत्यांच्या मनावर एक वेगळीच छाप उमटवली आहे. या यादीमधील एक चित्रपट म्हणजे ‘सैराट.’ हा चित्रपट प्रदर्शित होऊन तब्बल तीन वर्षे उलटली असली तरी चित्रपटातील गाणी तसेच डायलॉग आजही अनेकांच्या तोंडून सरास ऐकायला मिळतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘सैराट’ या चित्रपटात रिंकू राजगूरु आणि आकाश ठोसर मुख्य भूमिकेत होते. रिंकूने चित्रपटात आर्चीची भूमिका साकारली होती तर आकाशने परश्याची. त्या दोघांची प्रेम कहाणी पाहणे आजही चाहत्यांना प्रचंड आवडते. या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासून बॉक्स ऑफिसवर धूमाकुळ घातला होता. ‘सैराट’ चित्रपटाची जादू पाहून बॉलिवूड चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरने हिंदी रिमेक करण्याचा निर्णय घेतला होता.

धर्मा प्रोडक्शन निर्मित ‘सैराट’च्या हिंदी रिमेकचे नाव ‘धडक’ ठेवण्यात आले होते. या रिमेकमध्ये अभिनेत्री जान्हवी कपूर आणि ईशान खट्टर मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटातून दोन्ही स्टार किड्सने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. मात्र या हिंदी रिमेकने बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नाही.

आणखी वाचा : तेलुगू चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये शाहिद कपूर, मानधन ऐकून बसेल धक्का

नुकताच रिंकू राजगुरुने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर जान्हवी कपूरसोबतचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये दोघी गळाभेट घेत असताना दिसत आहेत. दरम्यान रिंकूने काळ्या रंगाचा कुर्ता परिधान केला आहे तर जान्हवीने मल्टी कलर टी-शर्ट आणि त्यावर निळ्या रंगाची जीन्स परिधान केली आहे. दोघींचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. हा फोटो शेअर करताना रिंकूने ‘जेव्हा सैराट धडकला भेटते’ असे कॅप्शन दिले आहे.

काही दिवसांपूर्वीच रिंकूचा ‘कागर’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. तर जान्हवी सध्या गुंजन सक्सेना यांच्या ‘द कारगिल गर्ल’ चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. या चित्रपटात ती महिला वैमानिकाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट १३ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sairat fem rinku rajguru met hindi remake dhadak girl janhvi kapoor avb