‘सैराट’ सिनेमा प्रदर्शित होऊन नाही नाही म्हणता २९ एप्रिलला एक वर्ष होईल. सिनेमा प्रदर्शित होऊन एक वर्ष उलटलं असलं तरी ‘झिंगाट’ची झिंग अजून प्रेक्षकांच्या मनातून उतरलेली नाही. लग्न समारंभात, पार्टीमध्ये, हळदीला किंवा इतर समारंभात ‘डिजे वाले बाबू’ अशा गाण्यांची मागणी करणारे आता ‘झिंगाट’ गाण्याची फर्माईश करताना दिसतात. आजही अनेकांच्या प्ले-लिस्टमध्ये ‘झिंगाट’, ‘सैराट झालं जी’ ही गाणी हमखास असणार. हा सिनेमा जेवढा गाण्यांसाठी गाजला तेवढाच तो त्यातल्या दृश्यांसाठीही गाजला. या सिनेमातली काही दृश्य तर इतकी सुरेखरित्या चित्रीत केली होती की, ती दृश्य पुन्हा एकदा पाहण्यासाठी अनेकांनी सैराट अनेकवेळा पाहिला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘ऐ परश्या आर्ची आली रं..’ अशी आरोळी ठोकणारा परश्याचा मित्र आठवतोय का? त्याचा आवाज ऐकून सगळं काही विसरून पाण्यात बेधडक उडी मारणारा हा क्षण आजही लोकांच्या मनात तसाच जिवंत आहे.

परश्या आपले आर्चीवरचे प्रेम व्यक्त करण्यासाठी अनेक नवनवीन युक्त्या शोधून काढायचा. त्यातलीच तिच्या चपलांवर फुलं ठेवण्याची कल्पना आजही अनेकजण वापरताना दिसतात.

सिनेमातील ‘सैराट झालं जी’ गाण्याचा शेवट ज्या ठिकाणी चित्रीत करण्यात आला आहे तो हा सीन ज्यापद्धतीने चित्रीत करण्यात आला होता ते प्रेक्षकांना प्रचंड आवडलं होतं.

आर्चीच्या प्रेमात आकंठ बुडालेला परश्या विहिरीत उडी मारतो तेव्हाचा क्षणही टाळ्या वाजवायला भाग पाडणारा असाच होता.

परश्या, आर्ची आणि त्यांचे मित्र गावातून पळून जातानाचा क्षण मनाला चटका लावून जातो.

आर्चीने बुलेटवरुन कॉलेजमध्ये जी एण्ट्री घेतली होती, तशीच आपणही एकदा घ्यावी असा विचार आजही अनेक मुलींच्या मनात सैराट सिनेमामुळेच कायम राहीला आहे.

‘सैराट झालं जी’ गाण्यातील अजून एक मनमोहक क्षण.

चिंब पावसात फुललेलं आर्ची आणि परश्याचं प्रेम अनेकांना प्रेरणा देऊन जात.

‘सैराटचं’ वेगळेपण म्‍हणजे, या सिनेमाचं चित्रीकरण गावात जरी झालं असलं तरी ते भकास कधीच वाटलं नाही. गावातलं सौंदर्य नव्याने नागराज मंजुळेने या सिनेमातून दाखवलं असंच म्हणावं लागेल.

‘सैराट’ सिनेमा जेवढा लोकप्रिय झाला तेवढीच सिनेमात चित्रीत करण्यात आलेली स्थळं ही झाली. आता हे झाडंच बघा ना.. आर्ची, परश्याच्या प्रेमाचं हे झाडं साक्षी होतं असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही.

करमाळा येथील विहिरीकडे चित्रीत केलेले दृष्‍यही प्रेक्षकांना खूप आवडले होते.

करमाळा तालुक्यातील जेऊर, केम, कंदर, चिखलठाण, वांगी, मांगी, पोफळज, मांजरगाव आसपासच्या गावांत करण्यात आलेल्या चित्रीकरणामुळे काही दृश्य अविस्मरणीय झाली आणि अशाच छोट्या छोट्या क्षणांनी ‘सैराट’ बनत गेला आणि तो प्रेक्षकांच्या मनाला भिडत गेला.

#SairatMainia तुम्हाला कसा वाटतोय… तुमच्या काय आठवणी आहेत… ते सुद्धा आम्हाला नक्की कळवा… loksatta.express@gmail.com  या ईमेल आयडीवर….

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sairat mania top scene from sairat marathi movie