पोर्न पटांना अलविदा करून बॉलीवूडमध्ये पाय रोवलेल्या अभिनेत्री सनी लिओनीने आपल्या मादक अदांनी आजवर अनेकांना घायाळ केले आहे. पण या ‘बेबी डॉल’च्या हृदयात मात्र सलमानलाच विशेष स्थान आहे. एका कार्यक्रमात तिने याची जाहीर कबुली दिली.
मी सलमानची खूप मोठी चाहती आहे आणि मी हे याआधीही अनेकदा सांगितले आहे. भारतात आल्यानंतर सलमान खाननेच माझे स्वागत केले होते. जेव्हा तुम्ही पदार्पण करत असता त्यावेळी पहिल्यांदा जे तुम्हाला शुभेच्छा आणि प्रेरणा देतात ते तुमच्यासाठी नेहमीच खास असतात. त्यामुळे माझ्या हृदयात सलमानला विशेष स्थान आहे, असे सनी म्हणाली.
बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्याआधी सनीने सलमानच्या ‘बिग बॉस’ या टेलिव्हिजन रिआलिटी शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभाग घेतला होता. त्यानंतर ती प्रसिद्धीच्या झोतात आली आणि ‘जिस्म-२’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 22-12-2015 at 15:04 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Salman has a special place in my heart says sunny leone