बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल लवकरच लग्न बंधनात अडकणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. असे म्हटले जात आहे की डिसेंबर महिन्यात राजस्थानमधील एका किल्ल्यावर शाहीथाटात विकी आणि कतरिना लग्न बंधनात अडकणार आहेत. त्यांच्या विवाह सोहळ्याला बॉलिवूडमधील अनेक कलाकार हजेरी लावणार आहेत. पण बॉलिवूडचा भाईजान सलमान खान कतरिनाच्या लग्नाला हजेरी लावणार नसल्याचे समोर आले. अशातच आता कतरिना आणि विकीच्या लग्नावर सलमान खानचे वडील सलीम खान यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सलीम खान यांनी नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये कतरिना आणि विकीच्या लग्नावर वक्तव्य केले. ‘मी याविषयावर काय बोलू… आजकाल फक्त मीडियाकडेच सर्व काही बोलण्यासारखे आहे’ असे सलीम खान म्हणाले.
आणखी वाचा : ‘घटस्फोटीत महिलांना देखील फिजिकल…’, लारा दत्ताचे वक्तव्य चर्चेत

कतरिना आणि विकी ७ ते १२ डिसेंबर दरम्यान लग्न करणार आहेत. या दोघांच्या लग्नाच्या वेळी फक्त कुटुंबातील काही निवडक व्यक्ती आणि मित्र-मैत्रिणी उपस्थित असणार आहेत. सर्व प्रथा परंपरेने लग्न करण्यापूर्वी कतरिना आणि विकीने मुंबईत कोर्ट मॅरेज करण्याचा निर्णय घेतला आहे. हे दोघेही शाही लग्नासाठी राजस्थानला रवाना होण्यापूर्वी पुढील आठवड्यात मुंबईत कोर्ट मॅरेज करणार आहेत. लग्नाच्या सर्व तयारीसाठी त्यांची टीम याची चाचपणी सध्या करत आहे, असे म्हटले जात आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Salman khan father salim khan breaks silence on katrina kaif and vicky kaushal wedding avb