काही दिवसांपूर्वी अभिनेता सलमान खानच्या ड्रायव्हर आणि दोन स्टार मेंबरला करोनाची लागण झाली होती. त्यानंतर आता भाईजानचा मॅनेजर जॉर्डी पटेल यालाही करोनाची लागण झाली आहे. ‘इंडिया टिव्ही’च्या वृत्तात याविषयी नमूद करण्यात आलं आहे.
जॉर्डीला करोनाची लागण होण्यापूर्वी सलमानच्या दोन स्टार मेंबर व कारचालकाला करोनाची लागण झाली होती. त्यावेळी सलमान आणि त्याच्या कुटुंबीयांनी करोना चाचणी केली होती. यात सगळ्यांचे रिपोर्ट्स निगेटिव्ह आले होते. यावेळी सलमान सेल्फ क्वारंटाइन असल्याचं सांगण्यात येत होतं.जॉर्डी हा सलमानचा मॅनेजर असण्यासोबतच तो सेलिब्रिटी मॅनेजर, निर्माता, गायकदेखील आहे.
दरम्यान, सलमान सध्या बिग बॉस १४ चं सूत्रसंचालन करत असून दुसरीकडे त्याच्या आगामी ‘राधे’ चित्रपटाचं चित्रीकरण सुरु आहे. लॉकडाउनच्या काळात त्याच्या काही चित्रपटांचं चित्रीकरण रखडलं होतं. मात्र, आता पुन्हा या चित्रपटांचं चित्रीकरण सुरु झालं आहे.