भाईजान सलमानच्या दोन बहिणी आहेत हे तर सर्वांना ठाऊक आहे. पण, अर्पिता आणि अलविराशिवाय त्याला आणखी एक बहिण आहे. तिचं नाव आहे, श्वेता रोहिरा. सामाजिक कार्यकर्ती श्वेता रोहिरा दरवर्षी सलमानला राखी बांधते. मुंबईतील अंधेरी इथल्या घरी श्वेताने नुकताच आपला वाढदिवस साजरा केला. तिच्या बर्थडे पार्टीला सलमानची कथित प्रेयसी लुलिया वंतूर, अभिनेत्री मौनी रॉय, आमना शरीफ, एली अवराम आणि इतरही काही सेलिब्रिटी हजर होते. या पार्टीमध्ये तिने आपल्या या मित्रमैत्रिणींना पुलकित आणि यामीचा विषय तिच्यासमोर न काढण्यास सांगितल्याचं म्हटलं जातंय.

२०१४ मध्ये अभिनेता पुलकित सम्राटसोबत श्वेताचं लग्न झालं होतं. पण, त्यांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. लग्नानंतर अवघ्या काही वर्षांतच त्यांच्या नात्याला तडा गेला. यामागचं कारण पुलकितची सहकलाकार यामी गौतमी हिच्यासोबतची वाढती जवळीक असल्याचं म्हटलं जातं. या दोघांच्या अफेअरच्या चर्चा ऐकल्यामुळे होणारा त्रास टाळण्यासाठी श्वेताने मित्रमैत्रिणींना त्यांच्याबद्दल न बोलण्यास सांगितल्याची माहिती ‘स्पॉटबॉय इ’ या वेबसाइटने दिली.

 

श्वेता रोहिरा, एली अवराम

 

श्वेता रोहिरा आणि मौनी रॉय

वाचा : …म्हणून नर्गिसने इन्स्टाग्रामवर उदय चोप्राला केलं अनफॉलो

पुलकितशी घटस्फोट घेतल्यानंतर श्वेताने एका मुलाखतीत यामीवर उघडपणे टीकाही केली होती. पुलकित आणि माझ्यात खटके उडाल्याचं कारण यामी होती, असंही तिने म्हटलं होतं.