समीरा रेड्डी आता ‘वर्देंची’ झाली. होय, अभिनेत्री समीर रेड्डी हीचा ‘वर्देंची’ सुपरबाईक्स कंपनीनेचे मालक अक्षय वर्दे यांच्याशी विवाह झाला आहे.
मोठ्या थाटात समीराचा विवाह सोहळा झाला. समीरा रेड्डी विवाह करणार असल्याच्या बाबतीत आजपर्यंत कमालीची गुप्तता राखण्यात आली होती. समीराला याआधीपासूनच वेगवान बाईक्सची आवड आहे. त्यात तिची जवळपास दोन-अडीच वर्षांपूर्वी ‘वर्देंची’ सुपरबाईक्सचे मालक अक्षय वर्दे यांच्याशी ओळख झाली आणि त्यानंतर त्यांच्यात प्रेमप्रकरण सुरू असल्याच्या बातम्याही मध्यंतरी होत्या.
समीराच्या वांद्रे येथील निवासस्थानी छोटेखानी कार्यक्रम घेऊन या दोघांचा साखरपुडाही झाला होता. तसेच एप्रिल २०१३ मध्ये दोघांच्या विवाहाची तारिख पक्की करण्यात आली होती. परंतु, कंपनीच्या कामात अक्षय व्यस्त असल्याने त्यापुढे जानेवारीत विवाह सोहळा करण्याचे ठरले. त्यानुसार विवाह सोहळा झाला आणि आज समीरा रेड्डी ‘वर्देंची’ झाली.
संग्रहित लेख, दिनांक 21st Jan 2014 रोजी प्रकाशित
समीरा रेड्डी झाली ‘वर्देंची’
समीरा रेड्डी आता 'वर्देंची' झाली. होय, अभिनेत्री समीर रेड्डी हीचा 'वर्देंची' सुपरबाईक्स कंपनीनेचे मालक अक्षय वर्दे यांच्याशी विवाह झाला आहे.
First published on: 21-01-2014 at 07:04 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sameera reddy to marry akshai varde today