‘जगात जर्मनी आणि देशात परभणी’ हा नारा महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचवणारा मराठमोळा अभिनेता म्हणजे संकर्षण कऱ्हाडे. त्याने ‘आम्ही सारे खवय्ये’ या कार्यक्रमातून महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या मनात घर केले आहे. नुकताच संकर्षणने लोकसत्ता ऑनलाइनला मुलाखात दिली. या मुलाखतीमध्ये त्याने दोन टवाळ मित्रांची कविता सादर केली आहे.
दोन टवाळ मित्र उभे असतात. त्यांच्या समोरुन एक देखणी, अतिशय सुंदर मुलगी जात असते. पहिला मित्र दुसऱ्या मित्राला म्हणतो…
कोण रे ही युवती मित्रा जाता मनातून जात नाही,
हिला पाहिलं रे पाहिलं की मी माणसातला माणूस राहत नाही
काय तिचं हे मित्रा अन् काय तिचं ते,
काही कर आणि खोपच्यात माझी भेट घालून दे
जुळू दे लवकर आमचं प्रेम पळू दे गाडी बुंगाट,
होताच माझं ब्रेकअप जुळवून देईल तुझं झंगाट
त्यावर दुसरा मित्र पहिल्या मित्राला म्हणतो…
अरे वा प्रेमाच्या तर गाड्या तुझ्या फारच बुंगाट पळतात
पण तुझ्यापेक्षा तिच्या भावना जास्ती मला कळतात
लग्न तिचं झालय मित्रा,
तिला नवरा, दीर आणि जावू आहेत
जिला खोपच्यात तुला भेटायचं आहे,
त्या पोरीचा मी भाऊ आहे
हे ऐकून पहिला मित्र पुन्हा दुसऱ्या मित्राला म्हणतो…
थोड्यासाठी मित्रा नको मॅटर घडवूस,
खोपच्यात भेटतो तुला पण इथं नको बडवूस
आधीच ताप होता मला, मी रात्रभर कणत होतो
आणि ती नाही रे मित्रा तिच्या बाजूची पोरगी म्हणत होतो
आणखी वाचा : नाट्यगृहांमध्ये जॅमर हवा की नको? संकर्षण कऱ्हाडेने दिले स्पष्ट उत्तर
संकर्षणची ही दोन टवाळ मित्रांची कविता प्रेक्षकांना प्रचंड आवडत असल्याचे दिसत आहे. या मुलाखतीमध्ये संकर्षणने नाट्यगृहांमध्ये वाजणाऱ्या मोबाईल संदर्भातदेखील वक्तव्य केले आहे.